30 C
Mumbai
Friday, April 19, 2024
Homeमुंबई'सिंग, डान्स अॅंड प्रे' चरित्रात्मक ग्रंथाचे राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते प्रकाशन

‘सिंग, डान्स अॅंड प्रे’ चरित्रात्मक ग्रंथाचे राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते प्रकाशन

टीम लय भारी 

मुंबई : इस्काॅनचे संस्थापक आचार्य श्रील प्रभुपाद यांच्या जीवन कार्यावर आधारीत ‘सिंग, डान्स अॅंड प्रे’ या चरित्रात्मक ग्रंथाचे प्रकाशन  आज (दि. 14 जुलै) राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते पार पडले. राजभवन येथे या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

ग्रंथप्रकाशन सोहळ्याच्या कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी गव्हर्नर ऑफ महाराष्ट्र कडून सोशल मिडीयावर पोस्ट करण्यात आले असून संबंधित कार्यक्रमाचा व्हिडिओ सुद्धा पोस्ट करण्यात आला आहे.

या कार्यक्रमप्रसंगी इस्काॅन बंगलोरचे वरिष्ठ उपाध्यक्ष व अक्षयपात्र फाऊंडेशनचे उपाध्यक्ष चंचलापती दास, हरेकृष्णा अभियान मुंबईचे अध्यक्ष अमितासन दास व पुस्तकाचे लेखक – पत्रकार हिंडोल सेनगुप्ता प्रामुख्याने उपस्थित होते, असे ट्वीटमध्ये नमूद करण्यात आले आहे.

सध्याच्या सत्ताकारणाच्या संघर्षात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भूमिकेवरून सगळ्याच माध्यमातून टीका होत आहे, त्यामुळे आता राज्यपालांच्या प्रत्येक कृतीकडे राज्यातील जनतेचे लक्ष असून नव्या सरकारच्या स्थापनेत कशी ते भूमिका बजावणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

हे सुद्धा वाचा…

असंसदीय शब्दांची यादी जाहीर होणे म्हणजे सर्वात मोठी शोकांतिका

पेट्रोल दराच्या निर्णयावर प्रकाश आंबेडकर भडकले

कोणाचे काय तर कोणाचे काय…? ‘आरे’च्या ‘कारे’वर सुमीत राघवनने केलेली प्रतिक्रिया वादात

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी