28 C
Mumbai
Thursday, March 28, 2024
Homeमुंबईअधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये पैशांची देवाणघेवाण, PWD मंत्र्यांनी व्यक्त केली हतबलता !

अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये पैशांची देवाणघेवाण, PWD मंत्र्यांनी व्यक्त केली हतबलता !

सार्वजनिक बांधकाम विभागाचे (पीडब्ल्यूडी) मंत्री आणि भाजप नेते रवींद्र चव्हाण यांनी पीडब्ल्यूडीमध्ये पैसे घेतल्यानंतर बदल्या होतात, असा धक्कादायक खुलासा केला आहे. पीडब्ल्यूडी विभागात होणाऱ्या बदल्यांमध्ये पैसे घेतले जातात, असे माझ्या कानावर आले आहे. त्याला आळा घालण्याचाही मी प्रयत्न करतोय; परंतु त्याला यश येत नाही, अशी खंत चव्हाण यांनी व्यक्त केली. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रोजेक्ट मॅनेजमेंट इन्फर्मेशन सिस्टम (पीएमआयएस) प्रणाली सोहळ्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हा धक्कादायक खुलासा केला आहे.

“बदल्यांमध्ये ज्या पद्धतीने पैसे घेतले जातात, ते यापुढे करू नका. यानंतरच्या काळातही करू नका. अधिकाऱ्यांनीच यामध्ये स्वतः मी बदलीसाठी पैसे देणार नाही, ही भूमिका ठेवली तर विभाग चांगल्या प्रकारे चालेल. मात्र या गोष्टी वारंवार होत राहिल्या तर मनाला वेदना होतात. नेहमी सांगूनसुद्धा अधिकारी स्वतःच्या स्वार्थासाठी हे करतात. त्यांची स्पर्धा काही विशिष्ट पदांसाठी आहे. त्या स्पर्धेसाठी ही सगळी मंडळी हे सगळं करत राहतात, त्यामुळे त्यांनी हे करू नये,” असा सल्लाही रवींद्र चव्हाण यांनी अधिकाऱ्यांना दिला अन्यथा कठोर कारवाई केली जाईल, अशी तंबीही त्यांनी या वेळी दिली.

खड्डा चार दिवसांत बुजवू
रस्त्यावरच्या खड्डय़ांचे फोटो या प्रणालीद्वारे नागरिकांनी पाठवले तर ते चार दिवसांत बुजवले जातील, तसेच फोटो मिळाल्यानंतर चार दिवसांनी तो खड्डा पुन्हा दिसला तर संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई केली जाईल, असा इशारा रवींद्र चव्हाण यांनी दिला. यावेळी रस्ते विभागाचे सचिव सदाशिव साळुंके, बांधकाम विभागाचे सचिव संजय दशपुते, पुण्याचे मुख्य अभियंता चव्हाण, मुंबई विभागाचे मुख्य अभियंता राजभोर आदी मान्यवर उपस्थित होते.

हे सुद्धा वाचा:

कोण रोहित पवार ? त्याची औकात काय ? मंत्री रवींद्र चव्हाण यांची जीभ घसरली

मंत्री रवींद्र चव्हाण फुलवणार ‘गुलाब’ !

कोकणच्या पर्यटनासाठी मंत्री रवींद्र चव्हाणांचा बूस्टर

PWD, Ravindra Chavan, transfers scam in PWD, BJP, Shiv Sena, PWD Ravindra Chavan expressed regret about transfers scam in PWD

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी