28.9 C
Mumbai
Friday, April 19, 2024
HomeमुंबईPWD : पीडब्ल्यूडीतील 'बदली' घोटाळ्याला रवींद्र चव्हाण यांचा चाप !

PWD : पीडब्ल्यूडीतील ‘बदली’ घोटाळ्याला रवींद्र चव्हाण यांचा चाप !

सरकारी खात्यातील अधिकाऱ्यांच्या बदल्या हा एक चर्चेचा विषय आहे. मग ते कोणतेही खाते असो. आशा बदलीसाठी दबाव आणणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करा असे आदेश सार्वजन‍िक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिले आहेत. सार्वजन‍िक बांधकाम विभागात (PWD) अनेक अधिकारी आपल्या कामावर अजून रुजू झालेले नाही.

सरकारी खात्यातील अधिकाऱ्यांच्या बदल्या हा एक चर्चेचा विषय आहे. मग ते कोणतेही खाते असो. आशा बदलीसाठी दबाव आणणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करा असे आदेश सार्वजन‍िक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिले आहेत. सार्वजन‍िक बांधकाम विभागात (PWD) अनेक अधिकारी आपल्या कामावर अजून रुजू झालेले नाही. तसेच अनेक अधिकारी आपल्या सोईनुसार बदली करून मिळावी यासाठी प्रयत्न करतांना दिसत आहेत. यासाठी ते विविध मार्गाने प्रयत्नशिल आहेत अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे अशा अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना तात्काळ कारणे दाखवा नोटीस बजावून शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आदेश सार्वजन‍िक मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिले आहेत.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची आढवा बैठक घेण्यात आली. यावेळी अनेक मोठे अधिकारी उपस्थित होते. या बैठकीमध्ये मंत्री रवींद्र चव्हाण यांनी अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीचा आढावा घेतला. तसेच सार्वजन‍िक बांधकाम विभागातील कर्मचाऱ्यांच्या अस्थापनेचा आढावा घेतला. या वेळी अनेक कर्मचारी आणि अधिकारी कामावर रूजू नसल्याचे दिसून आले. कर्मचाऱ्यांच्या या चुकीच्या वागण्यामुळे कामाचा ताण अन्य कर्मचाऱ्यांवर पडत असल्याची बाब लक्षात आल्याने सर्व कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी आपल्या कामावर रुजू होण्याची तंबी मंत्री चव्हाण यांनी दिली. आशा अधिकऱ्यांना कारणे दाखवा नोटीस देण्याचे आदेश देखील देण्यात आले.

हे सुद्धा वाचा

Mobile Charger : मोबाईल चार्जर देखील करु शकतो तुमचे बँक खाते रिकामे

ED : पत्राचाळ बैठकीला ‘दोन’ माजी मंत्री हजर असल्याचा ईडीचा आरोप

Narayan Rane :सीआरझेड उल्लंघन प्रकरणी नारायण राणेंचा बंगला तोडणार, 10 लाखांचा दंडही दयावा लागणार

रस्त्यांवरील खड्ड्यांचा‍ विषय हा सर्वांच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. त्यातच हे कर्मचारी चालढकल करीत आहेत. त्यामुळे नागरिकांची मोठयाप्रमाणात गैरसोय होत आहे. मोबाईल ॲप तयार करून या कामांचा आढावा घेण्याचे आदेश देखील त्यांनी यावेळी दिले. रखडलेली कामे युद्धपातळीवर मार्गी लावण्याचे आदेश त्यांनी संबंधीत कर्मचाऱ्यांना दिले. पावसाळयानंतर रस्ते तातडीने खड्डे मुक्त करण्यात यावेत, तसेच घाट रस्त्यांच्या पर्यायी मार्गाची दुरुस्ती अद्यापही झालेली नाही. त्यामुळे वाहन चालाकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. तसेच शासकीय इमारती व हॉस्पिटलची कामे देखील वेळेत पूर्ण करावीत असे आदेश मंत्री रवींद्र चव्हाण यांनी अधिकाऱ्यांना दिली.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी