30 C
Mumbai
Friday, May 12, 2023
घरमुंबईमध्य, हार्बर रेल्वेवर उद्या मेगाब्लॉक! 'या' वेळेत धावतील लोकल ट्रेन

मध्य, हार्बर रेल्वेवर उद्या मेगाब्लॉक! ‘या’ वेळेत धावतील लोकल ट्रेन

मुंबईकरांनो, उद्या रविवारी काही महत्त्वाचे काम असेल तरच घराबाहेर पडा. कारण, उपनगरी रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती तसेच सिग्नल यंत्रणेत काही तांत्रिक कामे करण्यासाठी रविवारी रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेवर मात्र मेगाब्लॉक असणार नाही. नियमित देखभाल दुरस्ती व अभियांत्रिकी कामासाठी मध्य रेल्वेने (Central Railway) मेगाब्लॉक जाहीर केला आहे. या कालावधीत लोकल पूर्णपणे बंद राहणार असून लांब पल्ल्याच्या गाड्यांची वाहतूक उशिराने धावणार असल्याची माहिती मध्य रेल्वेच्यावतीने देण्यात आली आहे.

नवी मुंबईतील पनवेल ते वाशी अप आणि डाऊन हार्बर मार्गावर सकाळी 11.05 ते सायंकाळी 4.05 वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येईल. या ब्लॉक कालावधीत पनवेल येथून सीएसएमटीकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि सीएसएमटी मुंबई येथून पनवेल, बेलापूरकरीता सुटणाऱ्या हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील. त्याचप्रमाणे पनवेल येथून ठाण्याकडे जाणाऱ्या अप-डाऊन ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील. या ब्लॉक कालावधीत बेलापूर आणि खारकोपर दरम्यान लोकल ट्रेन वेळापत्रकानुसार धावतील. (Railway Mega Block)

दरम्यान, मध्य रेल्वेवर विद्याविहार आणि ठाणे अप आणि डाऊन पाचवी सहावी मार्गिकेवर सकाळी 11 ते दुपारी 3.30 वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेणयात येणार आहे. या ब्लॉकदरम्यान मेल एक्स्प्रेस गाड्या कल्याण ते ठाणे दरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि 10 ते 15 मिनिटे उशिराने पोहोचतील.

हे सुद्धा वाचा: मुंबईकरांसाठी खास ‘संविधान रेल डबा’, मध्य रेल्वेचा नवा उपक्रम

प्रवाशांसाठी खुशखबर! एकाच कार्डवर करा मोनो, मेट्रो, रेल्वे आणि बसमधून प्रवास

लालू प्रसाद यादव यांच्यावर रेल्वे भरती घोटाळा प्रकरणी खटला चालविण्यास गृहमंत्रालयाची परवानगी

या मेल/एक्स्प्रेस उशीराने धावतील
लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सुटणाऱ्या डाउन मेल/एक्स्प्रेस गाड्या ठाणे आणि कल्याण दरम्यान डाउन जलद मार्गावर वळवण्यात येतील. तसेच या मेल/एक्स्प्रेस 10 ते 15 मिनिटे उशिराने पोहोचतील. यामध्ये 11055 लोकमान्य टिळक टर्मिनस-गोरखपूर गोदान एक्स्प्रेस, 11061 लोकमान्य टिळक टर्मिनस-जयनगर एक्स्प्रेस, 16345 लोकमान्य टिळक टर्मिनस-तिरुवानंतपुरम नेत्रावती एक्स्प्रेस, 17222 लोकमान्य टिळक टर्मिनस-काकीनाडा एक्स्प्रेस, 11071 लोकमान्य टिळक टर्मिनस-वाराणसी कामायनी एक्स्प्रेस, 13202 लोकमान्य टिळक टर्मिनस-पटना एक्स्प्रेस, 12619 लोकमान्य टिळक टर्मिनस-मंगळुरू या सर्व एक्स्प्रेस उशीराने धावणार आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी