28 C
Mumbai
Sunday, September 4, 2022
घरमुंबईRaj Thackeray : लाचार होऊन निवडणूक लढवू नका : राज ठाकरे

Raj Thackeray : लाचार होऊन निवडणूक लढवू नका : राज ठाकरे

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे पुन्हा एकदा ऍक्शन मोडमध्ये आले आहेत. आज (ता. २३ ऑगस्ट) त्यांनी मुंबईतील रवींद्र नाट्यमंदिर येथे राज्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती. यावेळी त्यांनी उपस्थित सर्व मनसे पदाधिकारी आणि महाराष्ट्र सैनिकांशी संवाद साधत त्यांना मार्गदर्शन केले.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे पुन्हा एकदा ऍक्शन मोडमध्ये आले आहेत. आज (ता. २३ ऑगस्ट) त्यांनी मुंबईतील रवींद्र नाट्यमंदिर येथे राज्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती. यावेळी त्यांनी उपस्थित सर्व मनसे पदाधिकारी आणि महाराष्ट्र सैनिकांशी संवाद साधत त्यांना मार्गदर्शन केले. आगामी महानगरपालिका आणि नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी राज्यातील सर्व पदाधिकाऱ्यांना संबोधित करत त्यांना कानमंत्र दिला. याशिवाय राज ठाकरे यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर सुद्धा आपले मत व्यक्त केले. राज ठाकरे यांच्यावर दोन महिन्यांपूर्वी हिप बोन्सची शस्त्रक्रिया झाली होती. त्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांनी आराम केला आणि आता पुन्हा एकदा ते ऍक्शन मोडमध्ये आलेले दिसून आले आहेत.

राज ठाकरे यांनी यावेळी उपस्थित असलेल्या सर्व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकऱ्यांना आगामी महानगरपालिका आणि नगरपालिका निवडणुकांना उद्धेशून संबोधित केले. ऍडजस्टमेन्ट करून किंवा लाचार होऊन निवडणुका लढाऊ नका. कारण ऍडजस्टमेन्ट करून निवडणुक लढवल्यास त्या गोष्टीला शून्य किंमत राहते. तसेच यामुळे तुमची किंमत देखील शून्य होते, असे यावेळी राज ठाकरे यांच्याकडून सांगण्यात आले.

तसेच आगामी न निवडणुका या पूर्ण ताकदीने लढवा. सर्वानी आपल्या प्रभागातील, विभागातील उमेदारांना पाठिंबा द्या, असे आवाहन राज ठाकरे यांच्याकडून पदाधिकाऱ्यांना करण्यात आले. तसेच आगामी महानगरपालिका आणि नगरपालिकांच्या पार्श्वभूमीवर ते लवकरच राज्यात अनंत चतुर्थीनंतर दौऱ्यावर निघणार असल्याची माहिती राज ठाकरे यांच्याकडून देण्यात आली. राज्यातील वेगवेगळ्या भागांमध्ये राज ठाकरे हे सभा घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांना आणि जनतेला मार्गदर्शन करणार आहेत.

हे सुद्धा वाचा

Breaking : शिवसेनेतील सत्तासंघर्ष घटनापीठाकडे वर्ग, सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

Dahi Handi 2022 : मुंबईतील गोविंदाच्या मृत्यूनंतर सरकारने दहिहंडीबाबत घेतलेल्या निर्णयांवर प्रश्न

Sonali Phogat : भाजपच्या टिकटॉक स्टार नेत्या सोनाली फोगट यांचा मृत्यू

यावेळी राज ठाकरे यांनी त्यांच्यावर झालेल्या शस्त्रक्रियेवर देखील भाष्य केले. कोरोनामुळे पुन्हा त्यांना हाडांचा त्रास बळावला, अशी माहिती त्यांच्याकडून यावेळी देण्यात आली. राज ठाकरे यांनी यावेळी उद्धव ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्षपणे घणाघात देखील केला. तसेच टोल मुक्तीच्या प्रश्नावरून भाजप आणि शिवसेनेवर राज ठाकरेंनी हल्लाबोल केला. राज ठाकरे यांनी पूर्ण दोन महिन्यानंतर पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी राज्याच्या कानाकोपऱ्यातून अनेक पदाधिकारी राज ठाकरे यांना ऐकण्यासाठी आले होते.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी