29 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
Homeमुंबईराज ठाकरेंचे मोदींना पत्र - 'देश की बेटियाँ'ना न्याय द्या !

राज ठाकरेंचे मोदींना पत्र – ‘देश की बेटियाँ’ना न्याय द्या !

ज्यांचा गौरव आपण 'देश की बेटियाँ' असा करत आलो आहोत आणि ज्यांच्या श्रमातून आपल्या देशाला कुस्तीच्या खेळात अनेक पदकं बघायला मिळाली आहेत, त्या महिला कुस्तीपटू गेले कित्येक दिवस त्यांच्या मागण्यासाठी दिल्लीत आक्रोश करत आहेत. 'प्रधानसेवक' ह्या नात्याने आपण ह्या विषयाकडे लक्ष द्यावं ही विनंती.

मनसे नेते राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. कुस्तीपटूंची अवहेलना थांबवा आणि ‘देश की बेटियाँ’ना न्याय द्या, अशी विनंती राज ठाकरेंनी मोदींकडे केली आहे. आपल्या देशातील सरकारला जर आपल्या दुःखाची पर्वा नाही असं चित्र उभं राहिलं तर ‘खेलो इंडिया’ हे स्वप्नच राहील. त्यांचं म्हणणं ऐकून त्यांना आश्वस्त केलं जाईल, अशी खात्रीही राज ठाकरेंना आहे.

नरेंद्र मोदीजी, ज्यांचा गौरव आपण ‘देश की बेटियाँ’ असा करत आलो, ज्यांच्या श्रमातून आपल्या देशाला कुस्तीच्या खेळात अनेक पदकं बघायला मिळाली, असे कुस्तीपटू न्यायासाठी आक्रोश करत असताना 28 मे रोजी ज्या पद्धतीने त्यांची फरफट झाली, तशी फरफट पुन्हा होऊ नये. आपण स्वतः या विषयात लक्ष घालून त्यांचं म्हणणं ऐकून घ्यावं, सन्मानजनक तोडगा काढावा आणि भारतीय क्रीडाजगताला आश्वस्त करावं, ही नम्र विनंती, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.

 

राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदींना लिहिलेले पत्र जसेच्या तसे –

सस्नेह जय महाराष्ट्र,

आज तुमचं एका महत्त्वाच्या विषयाकडे लक्ष वेधून घेण्यासाठी हा पत्रप्रपंच. खरं तर, लक्ष वेधून घेणं हे तेंव्हा म्हणता येईल जेंव्हा तुम्हाला त्या विषयाची पुरेशी माहिती नसेल तर. पण आपणांस हा विषय माहीत आहे हे नक्की, त्यामुळे आता ‘प्रधानसेवक’ ह्या नात्याने आपण ह्या विषयाकडे लक्ष द्यावं ही विनंती.

ज्यांचा गौरव आपण ‘देश की बेटियाँ’असा करत आलो आहोत आणि ज्यांच्या श्रमातून आपल्या देशाला कुस्तीच्या खेळात अनेक पदकं बघायला मिळाली आहेत, त्या महिला कुस्तीपटू गेले कित्येक दिवस त्यांच्या मागण्यासाठी दिल्लीत आक्रोश करत आहेत. रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी त्यांचा लैंगिक छळ केल्याची तक्रार आहे. अशा परिस्थितीत आपल्याला न्याय मिळावा, आणि ह्या लढाईत कोणाच्याही ‘बाहुबला’चं दडपण किंवा अडथळा येणार नाही इतकीच त्यांना खात्री सरकारकडून हवी आहे, म्हणजे अर्थात आपणाकडून हवी आहे.

Raj Thakre Letter To PM Desh Ki Betiya,
राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेले पत्र

ह्या आधी आपण गुजरातचे मुख्यमंत्री असताना उत्तराखंडमध्ये दुर्घटना घडली तेंव्हा असो की मुंबईतील 26/11 च्या घटनेच्या वेळेस धाव घेतली होतीत. ही तुमची सहृदयता होती आणि हीच सहृदयता तुम्ही तुमच्या कार्यालयापासून किंवा निवास्थानापासून अवघ्या काही किलोमीटवर असलेल्या महिला कुस्तीपटूंना दाखवावी, ही जशी त्या महिला कुस्तीपटूंची आहे तशीच इच्छा/ विनंती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची पण आहे.

हे सुद्धा वाचा :

असंवेदनशील, अहंकारी व शेतक-यांचा मारेकरी पंतप्रधान म्हणून इतिहासात मोदींची नोंद होईल – नाना पटोले

मोदी सरकारचे धोरण शेतकरी विरोधी – शरद पवार

अंधभक्तांचे विश्वगुरू गप्प का ? संजय राऊतांचा नरेंद्र मोदींना सवाल

म्हणूनच जर त्यांना योग्य न्याय नाही मिळाला तर कुठल्या खेळाडूला स्वतःच्या रक्ताचं पाणी करून देशासाठी पदक मिळवावं असं वाटेल? आपल्या देशातील सरकारला जर आपल्या दुःखाची पर्वा नाही असं चित्र उभं राहिलं तर ‘खेलो इंडिया’ हे स्वप्नच राहील. जर आपण खेळाडूंना देशाचा गौरव म्हणत असू तर मग त्यांची २८ मे ला ज्या पद्धतीने फरफट झाली तशी फरफट होणार नाही आणि त्यांचं म्हणणं ऐकून त्यांना आश्वस्त केलं जाईल इतकं तर आपण नक्कीच कराल ह्याची मला खात्री आहे.

आपण ह्या विषयांत लक्ष घालावं आणि ह्या विषयात तोडगा काढावा ही पुन्हा एकदा विनंती.

आपला,
राज ठाकरे 

Raj Thackerays Letter To Modi, Desh Ki Betiya, Modi Give Justice, Give Justice to Desh Ki Betiya, Raj Thakre Letter To PM

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी