29 C
Mumbai
Sunday, May 14, 2023
घरमुंबईजिऱ्याच्या फोडणीला बसतोय महागाईचा तडका; हे आहे कारण

जिऱ्याच्या फोडणीला बसतोय महागाईचा तडका; हे आहे कारण

आजच्या महागाईच्या काळात अनेक वस्तूंचे बाजारभाव वर-खाली होत असतात. पेट्रोल-डिझेलपासून घरगुती वापराच्या सिलेंडरपर्यंत दर कपात होण्याकडे सामान्य माणूस आशेने नजर लावून बसलेला असतो. नव्या वर्षातही आर्थिक वाढीवर चढ्या महागाईची टांगती तलवार राहण्याची भीती व्यक्त करण्यात आली होती. त्याचप्रमाणे मागील आठवड्यात जाहीर झालेल्या बजेटमध्येसुद्धा विकासकामांचा आराखडा वाचण्यात आला. मात्र हे सगळं बाजूला ठेवत ही किरकोळ महागाई अद्याप चढ्या पातळीवर असल्याने आर्थिक विकासदराची जोखीम अजूनही देशावर कायम असल्याचे चित्र आहे.  सद्यस्थितीत, किरकोळ बाजारात एक किलो जिऱ्याचे भाव ३८० ते ४०० रुपयांपर्यंत जाऊन पोहोचले आहेत. त्यामुळे गृहीणींसाठी स्वयंपाकघरात सढळ हाताने वापरल्या जाणाऱ्या जिऱ्याला पहिल्यांदाच उच्चांकी भाव मिळाल्याने जिऱ्याच्या फोडणीला आता महागाईचा तडका बसणार असल्याचे चित्र आहे. (Rajasthan-Gujrat cumin seeds market facing Inflation)

देशात जिऱ्याची लागवड गुजरात आणि राजस्थानात राज्यात होते. त्याचप्रमाणे देशातंर्गत पातळीवरील मागणी तसेच निर्यात विचारात घेता साधारणपणे ७५ लाख पिशव्या जिऱ्याचा पुरवठा अपेक्षित आहे. मात्र, गुजरात आणि राजस्थानात गेले दोन वर्ष जिऱ्याची लागवड कमी प्रमाणावर होत असल्याने मागणीच्या तुलनेत जिऱ्याची आवक कमी झाली आहे आणि याचा फटका सर्वसामन्यांच्या खिशाला बसणार आहे. त्याचप्रमाणे जिरा लागवडीसाठी नवीन हंगाम सुरू होण्यास आणखी महिनाभराचा कालावधी असल्याची माहिती जिरे व्यापाऱ्यांनी दिली.

गेल्या हंगामात जिऱ्याचे उत्पादन ५० लाख पिशव्या झाले होते. यंदा जिऱ्याचे उत्पादन ५० ते ५५ लाख पिशव्या एवढे होण्याची शक्यता आहे. जिऱ्याचे भाव साधारणपणे १७५ ते २२० रुपये किलोपर्यंत असतात. यंदा नवीन हंगाम मार्च महिन्यात सुरू होणार असून हवामान बदलाचा परिणाम जिरे लागवडीवर होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे गेले दोन वर्ष जिऱ्याचे उत्पादन कमी प्रमाणावर होत आहे. त्यामुळे मागणीच्या तुलनेत उत्पादन कमी होत आहे. परिणामी जिऱ्याच्या भावात पहिल्यांदाच उच्चांकी भाववाढ झाल्याचे निरीक्षण गुजरातमधील ऊंजा येथील जिरे व्यापारी रमेश पटेल यांनी दिले.

गुजरातमध्ये अहमदाबादपासून १०० किलोमीटर अंतरावर ऊजा गावात देशातील सर्वात मोठी जिरे बाजारपेठ आहे. गुजरातमधील कच्छ, सौराष्ट्र, बनासकाठा, राजस्थानमधील अबूनगर, श्रीगंगानगर भागात जिऱ्याची लागवड केली जाते. तेथून जिरे गुजरातमधील ऊंजा बाजारात विक्रीस पाठविले जातात. ऊजातून देशभरात जिरे विक्रीस पाठविले जातात.

हे सुद्धा वाचा : पंतप्रधानांचे लाडके उद्योगपती अदानीशेठचा बाजार उठतोय!

BUDGET 2023-24 : अर्थसंकल्पानंतर शेअर बाजारात तेजी, ७ लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर कर नाही; जाणून घ्या अजून काय आहे बजेटमध्ये

Lumpi Virus : ‘लम्पी स्किन’ आजारामुळे जनावरांचे बाजार बंद!

संपूर्ण जगभरात भारतातून जिरे निर्यात केले जातात. परदेशात सीरिया, तुर्की, इराण, अफगाणिस्तानात जिऱ्याची लागवड केली जाते. परदेशातील जिऱ्याचे उत्पादन साधारणपणे दहा लाख पिशव्या एवढे होते, जे अपुरे आहे. दरवर्षी गुजरात, राजस्थान या दोन राज्यात साधारणपणे ७५ लाख पिशव्यांचे उत्पादन होते. मात्र, गेल्या दोन हंगामात जिऱ्याचे उत्पादन कमी झाले आहे. त्यामुळे जिऱ्याला उच्चांकी भाव मिळाला आहे. नवीन हंगाम सुरू झाल्यानंतर जिऱ्याच्या भावात काहीशी घट होईल, असे जिरे व्यापारी रमेश पटेल यांनी सांगितले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी