26 C
Mumbai
Sunday, March 19, 2023
घरमुंबईमंत्री रवींद्र चव्हाण फुलवणार 'गुलाब' !

मंत्री रवींद्र चव्हाण फुलवणार ‘गुलाब’ !

डोंबिवलीकरांना उद्यापासून गुलाबी दुनियेची सफर घडणार आहे. लाल, गुलाबी, पिवळा, नारिंगी, निळसर, पांढरा, दुरंगी, रेघांचा, सुवासिक, मिनिएचर अशा विविध प्रकारच्या गुलांबांच्या फुलांच्या दुनियेची सफर सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण (Ravindra Chavan) घडवून आणणार आहेत. त्यामुळे विकेंडला डोंबिवलीकरांसमोर अतिशय उल्हासित करणारे गुलाबी विश्व मंत्री रविंद्र चव्हाण फुलविणार आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही १३ ते १५ जानेवारी दरम्यान ‘डोंबिवलीकर रोझ फेस्टिवल’चे (Dombivlikar Rose Festival) आयोजन करण्यात आले असून बालभवन, रामनगर, डोंबिवली पूर्व येथे हे प्रदर्शन भरणार आहे. राज्यभरातून आलेल्या गुलाबांच्या विविध जातींचे तसेच विविध रंगाचे, सुवासिक गुलाब पाहण्याची संधी उपलब्ध होणार आहे. शुक्रवारी (दि.१३) रोजी मंत्री चव्हाण यांच्या हस्ते या प्रदशनाचे उद्घाटन होणार आहे. (Ravindra Chavan, Dombivlikar Rose Festival)

या प्रदर्शनाबाबत माहिती देताना मंत्री रविंद्र चव्हाण म्हणाले, इंडियन रोझ फेडरेशन या अखिल भारतीय गुलाबप्रेमी संस्थेच्या सहकार्याने महाराष्ट्रातील मोठमोठ्या गुलाब शेती करणाऱ्या व्यक्ती व संस्था ‘डोंबिवलीकर रोझ फेस्टिवल’मध्ये सहभागी होणार आहेत. सकाळी १० ते रात्री ०९ पर्यंत हे प्रदर्शन सुरु राहणार आहे. त्याप्रमाणे मुंबई, पुणे, वांगणी, पनवेल, नाशिक शहापूरमधील गुलाब उत्पादकही सहभागी होणार आहेत. फेस्टिवलमध्ये गुलाब स्पर्धाचे आयोजन केले असून स्पर्धेतील विजेत्यांना गुलाबांचा राजा, राणी, युवराज, युवराज्ञी आदी अनोखी बक्षिसे देण्यात येणार आहेत.

ठाणे जिल्ह्यातील दोन प्रमुख गुलाब उत्पादक सहभागी होणार

ठाणे जिल्ह्यातील दोन प्रमुख गुलाब उत्पादक कल्याणचे डॉ. म्हसकर व वांगणीचे मोरे बंधू पहिल्या वर्षांपासून प्रदर्शनात सहभागी होत आहेत. दोघांनीही गुलाब लागवडीत खरोखर पथदर्शक काम केले आहे. डॉ. म्हसकर कल्याण डोंबिवलीतील प्रख्यात प्रसूतीतज्ज्ञ असून ते सच्चे गुलाबप्रेमी आहेत. तर वांगणीच्या आशिष मोरे यांनी भारतातील विविध गुलाब प्रदर्शन स्पर्धांमध्ये अनेक पारितोषिके जिंकली आहेत, असे देखील मंत्री चव्हाण यांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा

अजब सरकारमध्ये गजब कारभार; ‘त्या’ निर्णयावर अशोक चव्हाण यांची प्रतिक्रिया

सत्यजित तांबे यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज; देवेंद्र फडणवीसांच्या मैत्रीचा परिणाम?

जगातील कोणत्या देशाचा पासपोर्ट सर्वात भारी आहे, माहितीये का?

तसेच दुर्मिळ टपाल तिकीटे, आणि प्रख्यात व्यक्तींच्या स्वाक्षऱ्यांचे संग्राहक सांगलीच्या गजानन पटवर्धन यांचे विविध देशांचे गुलाब विषयावरील प्रदर्शन पाहायला मिळेल. त्यांनी देशविदेशातील सुमारे ५० हजार टपाल तिकिटे, त्या संबंधीचे टपाल साहित्य, तसेच सुमारे १ हजार ५०० हून अधिक स्वाक्षऱ्या वैशिष्ट्य पूर्ण संग्रहात जतन केल्या आहेत असेही मंत्री चव्हाण यांनी सांगितले.

घराच्या बागेतील गुलाबही प्रदर्शनामध्ये मांडता येणार 

डोंबिवली गुलाब प्रदर्शनामध्ये सर्वसामान्य डोंबिवलीकरांना केवळ छानछान गुलाब पहायला मिळणार नाहीत तर त्यांच्या घराच्या बागेतील गुलाबही प्रदर्शनामध्ये मांडता येणार आहेत. हौशी स्पधर्कांच्या स्पर्धेत त्यांना सहभागी होता येईल. व्यावसायिक व घरगुती विभागातील स्पर्धेत लाल, गुलाबी, पिवळा, नारिंगी, निळसर, पांढरा, दुरंगी, रेघांचा, सुवासिक, मिनिएचर इ. १० प्रकारच्या गुलाबांचा समावेश असेल. गुलाब प्रदर्शनाव्यतिरिक्त याप्रसंगी आकर्षक पुष्परचना सजावटीची स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. यामध्ये गुलाब फुलाला केंद्र स्थानी ठेवून अन्य फुले वापरण्याची मुभा देण्यात आली आहे.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी