32 C
Mumbai
Wednesday, April 24, 2024
HomeमुंबईRBI Repo Rate Hike : नव्या वर्षात आरबीआयचा दणका; पुन्हा वाढवले व्याजदर

RBI Repo Rate Hike : नव्या वर्षात आरबीआयचा दणका; पुन्हा वाढवले व्याजदर

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) नवीन वर्षात पुन्हा एकदा रेपो दरात वाढ केली आहे. RBI च्या पतधोरणात बदल करताना यावेळी व्याजदरात 0.25 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. यासोबतच आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांत दास रेपो दरात ०.२५ टक्क्यांनी वाढ केली आहे, याचा सामान्य जनतेला चांगलाच फटका बसणार आहे.

भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) नवीन वर्षात पुन्हा एकदा रेपो दरात वाढ करून करोडो देशवासीयांना धक्का दिला आहे. केंद्रीय बँकेने पतधोरणात बदल करताना व्याजदरात 0.25 टक्क्यांनी वाढ केली आहे. RBI गव्हर्नर शक्तीकांत दास (Shaktikanta Das) यांनी RBI च्या आर्थिक पुनरावलोकन धोरणानंतर रेपो दरात हा बदल जाहीर केला आहे. रेपो दरात 25 बेसिस पॉईंट्सच्या वाढीनंतर तो 6.50 टक्के झाला आहे. यापूर्वी रेपो दर ६.२५ टक्के होता. तत्पूर्वी, तीन दिवसांपासून सुरू असलेली आर्थिक आढावा धोरणाची बैठक आज 8 फेब्रुवारील रोजी संपली. (RBI hikes interest rates again)

आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास म्हणाले की, गेल्या सुमारे तीन वर्षांत विविध आव्हानांमुळे जगभरातील मध्यवर्ती बँकांसमोर चलनविषयक धोरण पातळीवर आव्हान निर्माण झाले आहे. यापूर्वी 7 डिसेंबर रोजी आरबीआयकडून रेपो दरात 35 बेसिस पॉईंट्सची वाढ करण्यात आली होती. रेपो दरात वाढ झाल्याचा थेट परिणाम बँकांकडून ग्राहकांना दिलेल्या कर्जाच्या व्याजदरावर होणार आहे. यामुळे ग्राहकांना पूर्वीपेक्षा जास्त ईएमआय भरावा लागणार आहे. वाढत्या महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी आरबीआयने हे पाऊल उचलले आहे.

नऊ महिन्यांत रेपो रेट 2.50 टक्क्यांनी वाढला
रिझर्व्ह बँकेने मे 2022 पासून रेपो दरात सहा वेळा वाढ केली आहे. या कालावधीत एकूण 2.50 टक्के वाढ झाली आहे. MPC च्या शिफारशीच्या आधारे, RBI ने प्रथमच 4 मे रोजी रेपो दरात 0.4 टक्के, 8 जून रोजी 0.5 टक्के, 5 ऑगस्ट रोजी 0.5 टक्के, 30 सप्टेंबर रोजी 0.5 टक्के आणि 7 डिसेंबर रोजी 0.35 टक्के वाढ केली होती.

काय होईल परिणाम
रेपो रेट वाढल्याने गृहकर्ज, कार कर्ज आणि वैयक्तिक कर्जाच्या ईएमआयवर परिणाम होईल. 2022-23 या आर्थिक वर्षात आर्थिक विकास दर 7 टक्के राहण्याचा अंदाज आहे. रेपो दरात वाढ केल्यास कर्ज घेण्याच्या खर्चात वाढ होईल. बँकांकडून पैसे उपलब्ध झाल्यास कर्जाचा व्याजदरही वाढेल. बँका हा परिणाम ग्राहकांपर्यंत पोहोचवतील.

हे सुद्धा वाचा : ‘या’ 48 हजार कोटींचे वाली कोण? ‘आरबीआय’कडून शोध सुरू

RBIच्या ‘रेपो रेट’मुळं घराचा हफ्ता वाढला !

रेपो रेटमुळे वाढलेलं खर्चाचं बजेट आता ‘एफडी’मुळे कमी होणार ; ‘या’ बँकांनी वाढवले व्याजदर

रेपो दर म्हणजे काय?
रेपो दर म्हणजे आरबीआयकडून कोणत्याही बँकेला कर्ज दिले जाते. त्या आधारे बँका ग्राहकांना कर्ज देतात. याशिवाय रिव्हर्स रेपो रेट हा दर आहे ज्यावर RBI बँकांना त्यांच्या ठेवींवर व्याज देते. आरबीआयचा रेपो रेट वाढल्याने बँकांवर बोजा वाढतो आणि बँका व्याजदर वाढवून ग्राहकांना भरपाई देतात.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी