29 C
Mumbai
Tuesday, August 2, 2022
घरमुंबईएकनाथ शिंदेंची जादू कायम; रामदास कदमांचा राजीनामा

एकनाथ शिंदेंची जादू कायम; रामदास कदमांचा राजीनामा

टीम लय भारी

मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जादू कायम आहे. शिवसेनेचे नाराज नेते रामदास कदम हे शिवसेनेतून बाहेर पडले. एकनाथ शिंदेच्या सोबत 60 आमदार बाहरे पडले. त्यानंतर आता काही खासदार शिवसेनेच्या वाटेवर आहे. तर अनेक नगरसेवर तसेच शाखा राजीनामा दिला आहे. सर्व जिल्हयातून शिवसेनला खिंडार पडत चालले आहे.

त्यानंतर शिवसेनेचे नाराज नेते रामदास कदम हे शिवसेनेतून बाहेर पडले. त्यांनी राजीनाम्याचे पत्र देतांना ते शिवसेना का सोडत आहेत. त्याचे सविस्तर वर्णन केले आहे. रामदास कदम म्हणतात की, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरंेच्या निधनानंतर ‘पक्षनेते पदाला किंमत राहिलेली नाही‘ तसेच माझा मुलगा योगेश कदत यांला अनेक वेळा अपमानीत करण्यात आले. ‘मला मीडिया समोर वक्तव्य’ करायला बंदी घालण्यात आली होती. त्यासाठी मला मातोश्रीवर बोलावण्यात आले होते. ‘मी तीन वर्ष तोंड दाबून बुक्कयांचा मार खात होता. महाविकास आघाडी सोबत न जाण्या विषयी मी हात जोडून विनंती केली. परंतु माझे ऐकले नाही. रामदास कदम हे विरोधी पक्ष नेतेपदी होते.

रामदास कदम हे महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेतेही राहिले आहेत. त्यांना फडणवीस सरकारमध्ये मंत्री करण्यात आले. रामदास कदम यांचा मुलगा योगेश दापोलीतून आमदार आहे. एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देणाऱ्या गुवाहाटीला पोहोचलेल्या शिवसेनेच्या बंडखोर आमदारांमध्ये त्यांचा समावेश होता.शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी काही दिवसांपूर्वीच पत्रकार परिषदेत अनिल परब यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले होते. अनिल परब हे शिवसेना संपवायला निघालेत’ असंही रामदास कदम म्हणाले होते. शिंदेंसोबत गेलेल्या या गटात आमदार योगेश कदम हेही होते. योगेश कदम यांनीही अनिल परब यांच्यावर काही गंभीर आरोप केले होते. अनिल परब हे राष्ट्रवादीला हाताशी धरून शिवसेना संपवत आहेत, असा थेट आरोप योगेश कदम यांनी केला होता.

:एकनाथ शिंदेंची जादू कायम; रामदास कदमांचा राजीनामा

हे सुध्दा वाचा :

जाहिरात, होर्डिंग, उत्सव नको! महाराष्ट्र भाजपचे जाहीर आवाहन

राष्ट्रपती पदाच्या शर्यतीत द्रौपदी मुर्मूंच्या विजयाची भाजपला खात्री

इंदौरहुन पुण्याला येणारी ‘महाराष्ट्र राज्य परिवहन’ची बस नर्मदा नदीमध्ये कोसळली; बसमध्ये 55 प्रवासी होते

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!