27 C
Mumbai
Wednesday, August 3, 2022
घरमुंबईआरे काॅलनीतील वाहतुक 24 तासांसाठी बंद, कारशेडच्या कामाचा मुद्दा पुन्हा चर्चेत

आरे काॅलनीतील वाहतुक 24 तासांसाठी बंद, कारशेडच्या कामाचा मुद्दा पुन्हा चर्चेत

टीम लय भारी

मुंबई : मुंबईत आरेवरून वातावरण आता चांगलंच तापलं असताना मुंबई वाहतुक पोलिसांनी आरे काॅलनीतील वाहतुक 24 तासांसाठी बंद करणार असल्याचे पत्र जारी केल्यामुळे कारशेडचे काम सुरू झाले का असा प्रश्न पर्यावरणप्रेमींमध्ये शंका निर्माण करू लागला आहे. आरे काॅलनी ते मरोळ नाका आणि आरे काॅलनी ते फिल्टर पाडा असे हे आरे काॅलनीतील प्रमुख मार्ग पोलिसांनी आज बंद ठेवले असून येथील वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग सुचवण्यात आले आहेत. दरम्यान गोरेगाव चेकनाक्यावर आज सकाळपासूनच पोलिसांचा मोठा बंदोबस्त पाहायला मिळत आहे.

याबाबत मुंबई वाहतुक पोलिसांनी एक पत्रक जारी केले असून ते सोशल मिडीयावर पोस्ट केले आहे. या पत्रकात असे म्हटले आहे की, बृहन्मुंबई महानगरपालिका आणि एमएमसीसी यांच्या तर्फे आरे काॅलनी येथे विविध कामे करावयाचे असल्याने दिंडोशी वाहतुक विभागातील आरे काॅलनी ते मरोळ नाका आणि आरे काॅलनी ते फिल्टर पाडा येथील वाहतुक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे, परंतु या पत्रकानंतर आरेत पुन्हा झाडे तोडली जाणार असल्याचा संशयच पर्यावरणप्रेमी आणि स्थानिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

https://twitter.com/MTPHereToHelp/status/1551424319557107712?s=20&t=FAWtEtEKD0aM78h5Ppj8WQ

दरम्यान, सदर मार्ग बंद असल्याने आरे मार्गे पवईला जाणाऱ्यांची गैरसोयीमुळे चांगलीच पंचाईत झाली आहे. वाहतुक बदलामुळे पवईला जाण्यासाठी जेव्हीआरएल मार्गांचा वापर करावा लागत आहे, त्यामुळे या मार्गावर वाहतुक कोंडी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र आरेतील नागरिकांनी बंद मार्ग वापरण्यास परवानगी देण्यात आली आहे. मुंबई वाहतुक पोलिसांच्या या अचानक निर्णयामुळे पर्यावरणप्रेमींकडून राग व्यक्त करण्यात येत आहे.

आरेच्या मुद्द्यावर दिवसेंदिवस वाद वाढू लागला आहे. नव्या सरकारने आरे कारशेड कामाला पुन्हा हिरवा कंदील दाखवला असला तरीही पर्यावरणप्रेमी दर रविवारी एकत्र येत आरेसाठी नारेबाजी करतात, सरकारला विणवतात आणि वेगवेगळ्या सामुहिक उपक्रमातून आरेचे महत्त्व पटवून देत आंदोलन करतात, परिणामी या आंंदोलनकर्तांना आता पोलिस नोटिसा बजावू लागल्याचे उघडकीस आले आहे.

हे सुद्धा वाचा…

द्रौपदी मुर्मू देशाच्या नव्या राष्ट्रपती, शपथविधी सोहळा संपन्न

MPSC अंतर्गत होणार ४३३ पदांची भरती

‘पाठीमागे उभे राहून माझ्या अंगावरून हात फिरवला’, शिवसेना महिला पदाधिकाऱ्याची ‘या’ नेत्याविरोधात तक्रार

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!