28 C
Mumbai
Friday, March 31, 2023
घरमुंबईराज्यातील मंत्र्यांसाठी RSS घेणार शिकवणी वर्ग !

राज्यातील मंत्र्यांसाठी RSS घेणार शिकवणी वर्ग !

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devebdra fadnavis) आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar bawankule) यांची राष्ट्रीय स्वयंसेवक संघा (RSS) कडून दोन दिवस मुंबईत शिकवणी घेतली जाणार आहे. यावेळी मंत्र्यांच्या हाती संघाचा अजेंडा दिला जाईल, असे म्हटले जाते. आपापल्या खात्याने गेल्या सहा महिन्यांत काय चांगले काम केले याची तयारी मंत्र्यांनीही केली आहे. मुख्यत्वे संघ आणि भाजपचे मंत्री यांच्यातील समन्वयासाठी ही बैठक होत असल्याची चर्चा आहे. (RSS will take classes for ministers in the state!)

राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर अशी बैठक पहिल्यांदाच होत आहे. त्याचप्रमाणे भाजपच्या राज्य कोअर कमिटीची बैठक 2 फेब्रुवारीला मुंबईत होणार आहे. पक्षाचे दोन दिवसांचे अधिवेशन नाशिक येथे 10 आणि 11 फेब्रुवारीला होणार आहे. या बैठकीचा अजेंडा कोअर कमिटीमध्ये ठरविला जाईल, असे सूत्रांनी सांगितले.

संघाच्या यशवंत भवन या कार्यालयात दि. 1 व 2 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या या बैठकीत संघाचे काही ज्येष्ठ पदाधिकारी मार्गदर्शन करणार आहेत. राज्य सरकारकडून संघाला नेमक्या कोणत्या अपेक्षा आहेत हे सांगितले जाईल, तसेच कोणत्या गोष्टींपासून दूर राहणे अपेक्षित आहे. याबाबत कानपिचक्याही दिल्या जातील अशीही चर्चा आहे.

हे सुद्धा वाचा : मोठी बातमी : देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदेंच्या पायात घातला कोलदांडा

Chandrashekhar Bavankule : चंद्रशेखर बावनकुळेंचा उंटाच्या पार्श्वभागाला मुका घेण्याचा प्रयत्न…

RSS : आरएसएसने बॉम्बस्फोटांचे दिले प्रशिक्षण, स्वयंसेवकाच्या दाव्याने खळबळ

आदिवासी विकासाच्या तसेच ग्रामविकासाच्या दृष्टीने कोणत्या योजना राबविल्या पाहिजेत. यावेळी सहकाराबाबतच्या अपेक्षा, महिला बालकल्याण संदर्भात कोणत्या बाबींवर लक्ष्य असावा. धार्मिक पर्यटनाला चालना आणि वैद्यकीय सेवा सुविधा पुरविताना कोणत्या घटकांवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. अनुसूचित जाती-जमातींसाठी सरकारकडून कोणत्या अपेक्षा आहेत. तसेच नव्या शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करताना विशेषत्वाने कोणते मुद्दे समोर असले पाहिजेत, आदी विषयांवर मंत्र्यांना मार्गदर्शन केले जाणार असल्याची माहिती आहे.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी