33 C
Mumbai
Wednesday, April 24, 2024
Homeमुंबईकौतुकास्पद: बाळंतपणाच्या वेदनादायक प्रक्रियेतून जावूनही 'ती'ने दिली बोर्डाची परीक्षा!

कौतुकास्पद: बाळंतपणाच्या वेदनादायक प्रक्रियेतून जावूनही ‘ती’ने दिली बोर्डाची परीक्षा!

आई झाल्यानंतर काही वेळातच महिलेने परीक्षा केंद्रावर जाऊन बोर्डाची परीक्षा दिली. तिच्या या कामगिरीचे सोशल मीडियावर खूप कौतुक होत आहे. सासरच्यांच्या मदतीने लग्नानंतरही तिने आपले शिक्षण सुरू ठेवले आहे. तिच्या या धाडसामुळे प्रत्येक महिलेची मान अभिमानाने उंचावली आहे.

सध्याच्या आधुनिक युगामध्ये प्रत्येक क्षेत्रात अग्रस्थानी आसणाऱ्या स्त्रीनं समाजात उच्च शिक्षणात रुची दाखवून प्रामाणिक कर्तुत्व पार पाडत समाजकार्यांत नाव लौकिक मिळवला आहे. आजच्या धकाधकीच्या काळामध्ये शिक्षण हे प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचा विषय आहे. दरम्यान, लग्नानंतर अभ्यास सोडून देणाऱ्या महिलांसाठी बिहारची रुक्मिणी आदर्श ठरतेय. जीने बाळाला जन्म दिल्यानंतर काहीच क्षणानंतर परीक्षा केंद्रावर जाऊन बोर्डाची परीक्षा दिली आहे. बांका येथील रहिवासी असलेल्या रुक्मिणीने वेदनादायक प्रक्रियेतून जावूनही तिची परीक्षा सोडली नाही. तिच्या या धडसाबद्दल भारतीय मातेमध्ये किती शक्ती आहे, हे पुन्हा एकदा समोर आले आहे. त्याचप्रमाणे सोशल मीडियावर तिचे खूप कौतुक होत आहे.

बिहारच्या बांका जिल्ह्यात राहणारी २२ वर्षीय रुक्मिणी कुमारी (Rukmini Kumari) यंदा बिहार बोर्डाची परीक्षा देत आहे. रुक्मिणी गरोदर होती आणि तिची प्रसूतीची तारीख जवळ आली होती. अशा परिस्थितीत रुक्मिणीला प्रसूती वेदना होऊ लागल्याने कुटुंबीयांनी तिला रुग्णालयात नेले. जिथे रात्रभर वेदना सहन केल्यानंतर सकाळी रुक्मिणीने मुलाला जन्म दिला. आता त्याच दिवशी होणाऱ्या परीक्षेला ती कशी जाणार हे आव्हान होते.

रुक्मिणीने परीक्षा देण्यासाठी डॉक्टरांची परवानगी मागितली आणि जन्म दिल्यानंतर केवळ 3 तासांनी तिच्या विज्ञान परीक्षेला बसण्यासाठी परीक्षा केंद्रावर पोहोचले. जिथे त्यांनी डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांची संपूर्ण तपासणी केली. मॅट्रिकची परीक्षा देणाऱ्या रुक्मिणीला अभ्यासाची खूप आवड आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, लग्नानंतरही तिने शिक्षण सुरू ठेवण्यासाठी सासरच्यांकडून परवानगी मागितली होती. सासरच्या मंडळींनीही रुक्मिणीला निराश केले नाही. त्यांनीही रुक्मिणीला आपले शिक्षण पूर्ण करण्यास प्रोत्साहित केले.

पत्रकार अंजना ओम कश्यप यांनी याबाबत अधिकृत ट्विट केले असून, “प्रिय रुक्मिणी कुमारी, तू एक प्रेरणा आहेस. हे मला महिलांच्या संघर्षाची आठवण करून देते.” अशा भावना व्यक्त केल्या आहेत.

नेटईझेन्सनी केला कौतुकांचा वर्षाव
ट्विटर हँडलमध्ये अनेक नेटईझेन्सने कॉमेंट करत लिहिले की, “ही कथा अनेक दशकांपासून अनेक मुलींना प्रेरणा देईल.”  तुमच्या रुक्मिणीजीचे जेवढे कौतुक करावे तेवढे कमी आहे, ही स्त्रीची खरी आणि नैसर्गिक शक्ती आहे म्हणून ती काहीही करू शकते, रुक्मिणी कुमारीजींचे अभिनंदन. एकाने टिप्पणी केली आहे की, “हे अनेकांसाठी प्रेरणा आहे जे नेहमी अपयशाचे कारण शोधतात. शिक्षणापेक्षा काहीही महत्त्वाचे नाही हे सिद्ध झाले आहे.

हे सुद्धा वाचा : अरेव्वा: केरळच्या नववधूने लग्नाच्या दिवशीच लॅबकोट घालून दिली परीक्षा..!

IAS भूषण गगराणी यांचे मार्गदर्शन, स्पर्धा परीक्षार्थींना दिल्या टीप्स !

डॉ. रघुनाथ माशेलकर म्हणाले, पुनर्जन्म मिळाला तर, तीच आई, तीच पत्नी, तीच मुले…

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी