29 C
Mumbai
Friday, April 19, 2024
Homeमुंबईअपघातात मृत्यू पावलेल्या बिहारी मजुराच्या कुटुंबियांना समीर वानखडेंचा मदतीचा हात

अपघातात मृत्यू पावलेल्या बिहारी मजुराच्या कुटुंबियांना समीर वानखडेंचा मदतीचा हात

हिंदी सिनेसृष्टीतील आघाडीचा अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खानला अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी अटक केल्यानंतर प्रकाशझोतात आलेल्या समीर वानखडेंचा सहृदयी चेहरा समोर आला आहे. त्यांच्या सामाजिक दातृत्वासाठी समीर वानखेडे हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. यावेळी त्यांनी एका बिहारी मजुराला मदत केली आहे. हा मजूर अपघातात मृत्यू पावला आहे. त्याच्या मागे त्याचं मोठं कुटुंब आहे. विनोदच्या मजुरीवरच त्याच्या कुटुंबाचा चरितार्थ चालत होता. हे कळताच समीर वानखेडे यांनी आपल्या पगारातील काही रक्कम त्याच्या कुटुंबियांना दिली आहे. समीर वानखेडे हे ‘एनसीबी’चे विभागीय संचालक होते. या काळात त्यांनी अनेक मोठ्या कारवाया केल्या आहेत. सध्या ते चेन्नई येथे वस्तू आणि सेवा कर विभागाचे संचालक आहेत. शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याला वानखेडे यांनी अटक केली होती. हे प्रकरण खूप गाजलं होतं. (Sameer Wankhade gave financial help to biihari labour who died in accident)

समीर वानखेडे सध्या चेन्नईत आहेत. मात्र, दोन दिवसांपूर्वीपूर्वी चेंबूर येथे दुर्घटना घडली होती. विनोद साहू नावाचा मूळचा बिहारचा असणारा हा मजूर लिफ्ट दुरुस्त करत होता. मात्र,यावेळी अचानक लिफ्ट कोसळली. या अपघातात विनोद जागीच ठार झाला. विनोद साहू हा मुंबईत मजुरी करायचा. गावी त्याचं मोठं कुटुंब आहे. आई, तीन अविवाहित बहिणी, बायको आणि मुलं असा त्याचा परिवार आहे. विनोदाच्या मृत्यूमुळे त्याच्या कुटुंबाचा आधार हरपला आहे. त्याच्या मृत्यूबाबत आणि त्याच्या कौटुंबिक परिस्थितीबाबत समीर वानखेडे यांना कळताच त्यांनी विनोदच्या कुटुंबियांना मदत करायचा निर्णय घेतला. त्यांनी आपल्या पगारातील मोठी रक्कम विनोदाच्या कुटूंबाला मदत म्हणून दिल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते निलोत्पल यांनी दिली.

मृत विनोद हा गेल्या काही वर्षा पासून मुंबईत मोलमजुरी करत होता. घटनेच्या दिवशी तो लिफ्ट दुरुस्त करण्यासाठी चढला असता अचानक लिफ्ट सुरू होऊन ती कोसळली. यावेळी विनोदचा जागीच मृत्यू झाला. मात्र, पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेण्यास टाळाटाळ केला. पोलिसांच्या बेजबाबदार वर्तणुकीविरोधात बिहारी सामाजिक संघटनांनी आक्रमक पवित्र घेत आंदोलन पुकारले. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. यावेळी समीर वानखडे यांनी दाखवलेल्या सामाजिक बांधीलकीबाबत बिहारी सामाजिक संघटनांच्या अधिकाऱ्यांनी त्यांचे आभार मानलेत. एका बाजूला मराठी बिहारी वाद निर्माण केला जात असताना दुसरीकडे एक मराठी भाषिक वरिष्ठ अधिकारी बिहारी मजुरांसाठी धावून आलेत. याबाबत वानखेडे यांचं कौतुक केलं जातं आहे.

हे सुद्धा वाचा

आठ वर्षांची असल्यापासून वडिलांकडून लैंगिक शोषण; भाजप नेत्या खुशबू सुंदर यांचे स्पष्टीकरण

ठाकरेंच्या ‘जीभ हासडून टाकू’ला एकनाथ शिंदे यांचे प्रत्युत्तर

भाजपच्या भ्रष्टाचार वॉशिंग मशीनच्या विरोधात उभे राहण्याची हीच ती वेळ

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी