28.9 C
Mumbai
Friday, April 19, 2024
HomeमुंबईSanjay Raut case : आमदार सुनील राऊत कडाडले; 50 लाखात जमीन घेतली...

Sanjay Raut case : आमदार सुनील राऊत कडाडले; 50 लाखात जमीन घेतली होती, आताची किंमत १ कोटी, मग भ्रष्टाचार कसा ?

संजय राऊत (Sanjay Raut) यांना ईडीने अटक केल्यानंतर आता आमदार सुनील राऊत दंड थोपटून मैदानात उतरले आहेत. मीडियासमोर बोलताना त्यांनी खणखणीत आवाजात भाजपचा समाचार घेतला. ईडीची कारवाई राजकीय असल्याचाही त्यांनी आरोप केला.

संजय राऊत (Sanjay Raut) यांना ईडीने अटक केल्यानंतर आता आमदार सुनील राऊत दंड थोपटून मैदानात उतरले आहेत. मीडियासमोर बोलताना त्यांनी खणखणीत आवाजात भाजपचा समाचार घेतला. ईडीची कारवाई राजकीय असल्याचाही त्यांनी आरोप केला. संजय राऊत हे बाळासाहेब ठाकरे यांचे शिष्य आहेत. ते भ्रष्टाचार करूच शकत नाहीत. त्यांच्या विरोधात जबरदस्तीने कागदपत्रे बनविली जात आहेत. संजय राऊत हे भाजपला अडचणीचे ठरत आहेत. म्हणून भाजपने हे कुभांड रचल्याचा आरोप राऊत यांनी केला. संजय राऊत स्टाईलमध्येच सुनील राऊत यांनीही खणखणीत आवाजात भाजप व ईडीच्या कारवाईला ठणकावले आहे.

पत्राचाळ जमीन विकत घेतली तेव्हा तिची किंमत 50 लाख रुपये होती. आता रेडीरेकनरनुसार त्या जमिनीची किंमत साधारण एक कोटी रुपये एवढी आहे. मग त्यात भ्रष्टाचार झाला कुठे असा प्रती सवाल सुद्धा सुनील राऊत यांनी केला. संजय राऊत यांनी केलेल्या व्यवहारांची माहिती आयकर विभागाला दिलेली आहे. निवडणूक प्रतिज्ञापत्रात सुद्धा ती माहिती नमूद केलेली आहे. परंतु जबरदस्तीने कागदपत्रे तयार करून संजय राऊत यांना अडचणीत आणले जात असल्याचा आरोप सुनील राऊत यांनी केला.

हे सुद्धा वाचा

उद्धव ठाकरे यांनी संजय राऊतांच्या खमक्या भूमिकेचे केले कौतुक

अगला स्टेशन ‘ मातोश्री’…? असं कसं घडू शकतं ?

वाचा : संजय राऊत यांच्या अटकेचा घटनाक्रम

उद्धव ठाकरे यांची ताकद कमी करण्यासाठी संजय राऊत यांच्यावर कारवाई केली आहे, असाही आरोप सुनील राऊत यांनी केला. स्वप्ना पाटकर प्रकरणात विलेपार्ले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांना चौकशीसाठी पाटकर यांचा मोबाईल हवा आहे. तरीही त्यांनी अद्याप मोबाईल दिलेला नाही. मोबाईल का दिला जात नाही, असा सवालही राऊत यांनी उपस्थित केला आहे.

सुनील राऊत संकटमोचक
आमदार सुनील राऊत हे विक्रोळी मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात. ते संजय राऊत यांचे भाऊ आहेत. परंतु सुनील राऊत मीडियासमोर फार दिसत नाहीत. संजय राऊत व शिवसेना अडचणीत असताना सुनील राऊत आज मीडियासमोर आले. त्यांनी आत्मविश्वासाने भाजपवर तोफ डागली. संजय राऊत यांना भाजपकडून मुद्दामहून गोवले जात आहे, हे त्यांनी पटवून सांगण्याचा प्रयत्न केला.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी