30 C
Mumbai
Tuesday, April 23, 2024
HomeमुंबईSanjay Raut Business Partner Booked : संजय राऊतांना धक्का, सुजित पाटकरांवर फसवणुकीचा...

Sanjay Raut Business Partner Booked : संजय राऊतांना धक्का, सुजित पाटकरांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल

पत्राचाळ जमीन घोटाळ्याप्रकरणी संजय राऊत यांना अटक केल्यानंतर त्यांचे निकटवर्तीय समजले जाणारे सुजित पाटकर यांची सुद्धा ईडीकडून चौकशी करण्यात आली होती. यानंतर आता पाटकर यांच्यावर थेट करोडोंच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्याने संजय राऊत यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. 

शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावरील ईडी कारवाईनंतर आता त्यांचे निकटवर्तीय बिझनेस पार्टनर सुजित पाटकर (Sujit Patkar) सुद्धा चांगलेच संकटात सापडले आहेत. कोरोनाच्या काळात कोविड सेंटरमध्ये 100 कोटींचा घोटाळा केल्याप्रकरणी पाटकर यांच्यावर मुंबईतील आझाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाटकर यांच्या लाईफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट कंपनीकडून बोगस कागदपत्रे सादर करण्यात आली आणि त्याआधारे कोविड सेंटर्सचे कंत्राट मिळवल्याचा गंभीर आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता. पुरेशी क्षमता नसून सुद्धा कंत्राट घेतल्याने यात अनेक कोविड रुग्णांचा मृत्यू झाल्याचे सुद्धा सोमय्या यांनी म्हटले होते. सोमय्यांच्या तक्रारीनंतर सुजित पाटकर यांच्यासह अन्य काही लोकांवर सुद्धा फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

या कोविड सेंटर घोटाळा प्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी काही दिवसांपुर्वी ट्विट करीत याबाबत स्पष्टता केली होती. किरीट सोमय्या यांनी ट्वीटमध्ये लिहिले होते की, “शिवसेना खासदार संजय राऊत यांची भागिदारी असलेली सुजीत पाटकर यांची बनावट कंपनी आहे. लाइफलाइन हॉस्पिटल मेनेजमेंट सर्व्हिस ही कंपनीच अस्तित्वातच नाही. परंतु, या कंपनीला दहिसर, वरळी NSCI, महालक्ष्मी रेसकोर्स, मुलुंड आणि पुण्यातील कोविड सेंटरचे कंत्राट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलं आहे. या कोविड सेंटरमध्ये अनेक कोरोना रूग्णांचा मृत्यू झाला असून या कंपनीने शंभर कोटी रूपयांचा जम्बो कोविड घोटाळा केला आहे.”, असा आरोप करून सोमय्या यांनी या प्रकरणाची चौकशी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण ऑथरिटीने करावी अशी मागणी केली होती.

हे सुद्धा वाचा…

VIDEO : पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीविरोधात काँग्रेसच्या सांस्कृतिक सेलचे आंदोलन

Ganeshotsav 2022 : मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून ‘माझा गणेशोत्सव माझा मताधिकार’ स्पर्धेचे आयोजन

The Kapil Sharma Show : अभिनेता कृष्णा अभिषेकने ‘द कपिल शर्मा शो’ मधून घेतली एक्झिट

दरम्यान, पत्राचाळ जमीन घोटाळ्याप्रकरणी संजय राऊत यांना अटक केल्यानंतर त्यांचे निकटवर्तीय समजले जाणारे सुजित पाटकर यांची सुद्धा ईडीकडून चौकशी करण्यात आली होती. यानंतर आता पाटकर यांच्यावर थेट करोडोंच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्याने संजय राऊत यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी