27 C
Mumbai
Tuesday, March 21, 2023
घरमुंबईमाझ्या नादाला लागू नका, राजवस्त्रे बाजूला काढा मग दाखवतो; संजय राऊत यांचे...

माझ्या नादाला लागू नका, राजवस्त्रे बाजूला काढा मग दाखवतो; संजय राऊत यांचे राणेंना आव्हान

भाजपचे नेते नारायण राणे (Narayan Rane) यांनी शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांना तुरुंगात पाठविण्याची धमकी दिली आहे. मी संजय राऊत यांना पुन्हा तुरुंगात पाठवण्याचा मार्ग मोकळा करत आहे. त्यांच्याविरोधात तक्रार दाखल करणार असून मी त्यांना सोडणार नाही, असा गर्भित इशारा राणे यांनी दिला आहे. संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राणेंवर त्वरित पलटवार केला असून रोखठोक भाषेत सुनावले आहे. मला तोंड उघडायला लावू नका. मी तुमची आर्थिक प्रकरणे बाहेर काढली, तर तुम्हाला ५० वर्षे तुरुंगात खितपत पडावे लागेल. माझ्या नादाला लागू नका. हिंमत असेल तर राजवस्त्रे बाजूला काढा, मग मी तुम्हाला दाखवतो, अशा आक्रमक शैलीत राऊत यांनी राणेंना आव्हान दिले आहे. शिवसेनेचे (ShivSena) मुखपत्र असलेल्या “सामना” (Samana) या दैनिकातील अग्रलेखात राणेंना डिवचण्यात आल्यांनतर राणे संतापले त्यानंतर त्यांनी संजय राऊत यांच्याविरोधात तक्रार दाखल करणार असल्याचे म्हंटले होते. (Sanjay Raut challenges Narayan Rane)

ईडीची नोटिस येताच पक्ष बदलणाऱ्या तुमच्यासारख्या पळपुट्यांनी धाडसाची भाषा करू नये, असा टोला संजय राऊत यांनी राणे यांना लगावला आहे. “मी अद्याप राणेंबद्दल काहीच बोललेलो नाही. झाकली मूठ सव्वा लाखाची. राणेंनी धमक्या देऊ नयेत. आणि तुम्ही काय मला तुरुंगात टाकणार. राजवस्त्रे बाजूला काढा, मग दाखवतो,” अशा शब्दांत राऊत यांनी राणेंना प्रत्युत्तर दिले आहे. ईडीच्या चौकशीला घाबरून मी पळून गेलो नाही. मी नामर्द नाही, असे म्हणत राऊत यांनी पुन्हा राणेंना डिवचले आहे.

हे सुद्धा वाचा

योगींनी उत्तरप्रदेशसाठी मुंबईतून ५ लाख कोटी नेले!

उर्फी सोबत महिला आयोगसुद्धा बेफाम झालाय का…; चित्रा वाघ यांचा हल्लाबोल

आडमुठ्या बिल्डरला २१ लाखाचा दंड, महापालिकेची कारवाई !

ईडीने चौकाशीसाठी बोलावल्यावर मी शरणागती पत्करली नाही. आम्ही नामर्द नाही. बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसैनिक आहोत. जे नेते मला तुरुंगात टाकण्याची धमकी देत आहेत त्यांच्या वक्तव्याची मी नोंद घेत आहे. या सर्व नोंदी मी सरन्यायाधीशांकडे पाठविणार असल्याचे राऊत यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले. त्यामुळे नारायण राणे आणि संजय राऊत यांच्यात पुन्हा वाकयुद्ध पेटण्याची चीन्हे दिसत आहेत.

पत्रचाळ गैरव्यवहार प्रकरणात संजय राऊत यांच्यावर ईडीने ठपका ठेवला आहे. त्यांचा जमीन रद्द करण्यात यावा यासाठी ईडीकडून शुक्रवारी मुंबई उच्चन्यायालयात याचिका दाखल करण्यात येणार आहे. पुढील आठवड्यात याचिकेवर सुनावणी होणार असून न्यायमूर्ती बोरकर यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी