30 C
Mumbai
Saturday, March 23, 2024
Homeमुंबईशहाजी बापू पाटील यांना प्राध्यापक नरकेंनी खडे बोल सुनावले

शहाजी बापू पाटील यांना प्राध्यापक नरकेंनी खडे बोल सुनावले

टीम लय भारी

मुंबई : प्राध्यापक हरी नरके हे कायमच आपल्या ट्विटवरून चर्चेत असतात. त्यांचे सर्वच ट्विट राजकारण्यांना टोलेबाजी करणारे असतात. असेच आणखी एक ट्विट प्राध्यापक हरी नरके यांच्याकडून करण्यात आले आहे. यामध्ये प्राध्यापक हरी नरके यांनी सेनेचे शिंदे गटातील बंडखोर आमदार शहाजी बापू पाटील यांना फैलावर घेतले आहे.

सेनेचे बंडखोर आमदार शहाजी बापू पाटील हे गुवाहाटीत असताना त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे प्रसिद्धी झोतात आले. काय ती झाडी… काय ते डोंगर… काय ते हाटिलं… त्यांचा हा डायलॉग तर लोकांनी डोक्यावर घेतला. त्यांच्या या वक्तव्यावर गाणी सुद्धा तयार करण्यात आली आहेत. त्यांच्या या भाषेच्या रंगंडेपणाचे आणि त्यांच्या या बोलण्याचे स्वतः एकनाथ शिंदे यांनी सुद्धा कौतुक केले. पण शहाजी बापू पाटील यांची काही वक्तव्ये मात्र ते लोकांना वेड्यात काढतात काय? याच प्रकारची असतात.

बुधवारी शहाजी बापू पाटील यांनी आपल्या मुलीच्या लग्नाचा किस्सा एका वाहिनीमधील मुलाखतीत सांगितला. मुलीच्या लग्नासाठी शहाजी बापूंनी नारायण राणे आणि विलासराव देशमुख आणि एकनाथ शिंदे यांच्याकडून एक ते सव्वा कोटी जमवून मुलीचे लग्न लावल्याचे त्यांनी सांगितले. पण यातील खरे काय? आणि खोटे काय? मतदारांना किती मूर्ख बनवणार असे प्राध्यापक नरके यांनी विचारले आहे.

‘आधी भाषेच्या रांगडेपणाचे कौतुक वाटले. पण आता माध्यमं त्यांची आरती करताहेत. पण ते खरं बोलताहेत का? मुलीच्या लग्नात सव्वा कोटी रुपये खर्च केले. पण बायको पाटलाची सून असून तिला नवं लुगडं घेता आलं नाही. तुम्हाला हे पटतं? बापू, मतदारांना किती मूर्ख समजणार? आवरा स्वतःला.’ असेही हरी नरके यांनी त्यांच्या ट्विटमधून बापूंना सल्ला दिला आहे.

हे सुद्धा वाचा :

फडणवीस-शिंदे भेटीचे गुपित मिसेस फडणवीसांनी केले उघड

शहाजी बापूंनी ‘होयची मान डोलवली‘ – हरि नरके

शहाजीबापू पाटील सांगोल्यात परतले अन् म्हणाले, बोकडाचं मटण कसे ओरपायचे ते शिकवतो

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी