27 C
Mumbai
Saturday, March 18, 2023
घरमुंबईशिंदे सरकारने महाराष्ट्रासाठी आणली ४५ हजार कोटींची गुंतवणूक

शिंदे सरकारने महाराष्ट्रासाठी आणली ४५ हजार कोटींची गुंतवणूक

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारच्या डाव्होस दौऱ्यावर शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी सडकून टीका केली आहे. तुमच्या नाकासमोर राज्यातील उद्योग गुजरातमध्ये पळवले जात आहेत. फॉक्सकॉन वेदांता, ड्रग्स पार्क, एअर बस हे मोठे प्रकल्प महाराष्ट्रातून परराज्यात गेले. त्यामुळे डाव्होसला जाण्याआधी गुजरातला जा, असा टोला राऊत यांनी शिंदे सरकारला लगावला आहे. पण एकनाथ शिंदे यांनी आपल्या कृतीतून संजय राऊत यांना प्रत्युत्तर दिले आहे. जागतिक आर्थिक मंचतर्फे (World Economic Forum) आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत पहिल्याच दिवशी महाराष्ट्र राज्यामध्ये सुमारे ४५ हजार ९०० कोटी रुपायांची गुंतवणूक करण्यात आल्याची माहिती राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली.

महाराष्ट्रातील मोठे प्रकल्प गुजरात, उत्तरप्रदेश यांसारख्या राज्यात पळवून नेले जात आहेत ते महाराष्ट्रात परत घेऊन या, आधी गुजरातला जा ! अशा खोचक शब्दांत शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी एकनाथ शिंदेंवर (Ekanth Shinde) टीका केली आहे. आता गुजरातमध्ये गेलेले प्रकल्प पुन्हा महाराष्ट्रात परत येतील की नाही याबाबत साशंकता असली तरी डाव्होस (Davos) येथील आंतरराष्ट्रीय परिषदेच्या पहिल्याच दिवशी महाराष्ट्रात सुमारे ४५ हजार ९०० कोटींची गुंतवणूक करण्यात आली आहे. त्यामुळे तब्बल १० हजार तरुणांना रोजगार उपलब्ध होणार आहेत, अशी माहिती राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी दिली. (Shinde government has brought an investment of 45 thousand crores for Maharashtra)

स्वित्झर्लंड येथील डाव्होस’मध्ये जागतिक आर्थिक मंचतर्फे (World Economic Forum) आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्योगमंत्री उदय सामंत सहभागी झाले आहेत. यावेळी, प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, ‘एमआयडीसी’चे मुख्य कार्यकारी अधिकारी विपिन शर्मा, टी. कृष्णा, श्रे एरेन, आशीष नवडे, स्टीफन आदी मान्यवर उपस्थित उपस्थित होते.

हे सुद्धा वाचा

बालाजी ऑईल मिलच्या मालकाकडून 8 लाखांची खंडणी उकळणाऱ्या न्यूज 24च्या पत्रकारासह 8 जण पोलिसांच्या ताब्यात

VIDEO : PWD च्या अधिकाऱ्यांनी रस्ता टाकला गिळून !

शिक्षण मंत्री दीपक केसरकरांच्या कार्यालयात सामान्य जनतेला मिळते अपमानास्पद वागणूक

 

आतापर्यंत राज्यकर्त्यांनी डाव्होसला जाऊन किती कोटींचे करार केले ?

डाव्होस येथे झालेल्या या करारांमुळे भविष्यात महाराष्ट्रातील बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होणार आहे. त्यामुळे राज्यासाठी ही आनंदाची बातमी आहे. पण या करारांबाबत संजय राऊत यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. ते म्हणाले, डाव्होसचे करार कसे होतात हे आम्हाला ठाऊक आहे. त्या ठिकाणी राज्यकर्ते येतात आणि आपले करारमदार करतात. मग तुम्ही सांगता पाच लाख कोटीचे करार झाले, दहा लाख कोटींचे करार झाले…आतापर्यंत राज्यकर्त्यांनी डाव्होसला जाऊन किती कोटी रुपयांचे करार केले ते सिद्ध करू शकले नाहीत.

या कंपन्यांसोबत सामंजस्य करार :

  • बर्कशायर हॅथवे होम सर्विसेस ओरेंडा इंडिया या कंपनीची १६ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक.
  • आयसीपी इन्व्हेस्टमेंट – इंडस कॅपिटल या कंपनीची राज्यात १६ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक.
  • ग्रीको एनर्जी प्रोजेक्ट्स या कंपनीने १२ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.
  • निपरो फार्मा पॅकेजिंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने एक हजार ६५० कोटींची गुंतवणूक राज्यात केली आहे.
  • रुखी फूड्स या कंपनीची महाराष्ट्रात ४८० कोटी रुपयांची गुंतवणूक.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी