29 C
Mumbai
Saturday, April 20, 2024
Homeमुंबईएकनाथ शिंदेंनी आदित्य ठाकरेंचा ‘हात’ तोडला !

एकनाथ शिंदेंनी आदित्य ठाकरेंचा ‘हात’ तोडला !

उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांना एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी जबरदस्त हादरा दिला आहे. आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) आमदार असलेल्या वरळी मतदारसंघातील माजी नगरसेवक (Worli Former corporator) संतोष खरात (Santosh Kharat) यांनाच एकनाथ शिंदे यांनी फोडून आपल्या गोटात सामील करून घेतले आहे. संतोष खरात यांचा वरळीमध्ये मोठा दबदबा आहे. घराघरात आणि घरांतील प्रत्येकांसोबत उठबस आलेला अत्यंत इमानी, मनमिळावू व जमिनीवर पाय असलेला माणूस अशी संतोष खरात यांची ख्याती आहे. आदित्य ठाकरेंचा वरळीतील जनसंपर्क हा संतोष खरात यांच्याच रूपाने टिकलेला होता. अर्ध्या रात्री सुद्धा संतोष खरात सामान्य जनतेसाठी उपलब्ध असतात. अशा अतिशय महत्वाच्या माणसालाच एकनाथ शिंदे यांनी ‘आपलेसे’ केल्यामुळे आदित्य ठाकरेंना आता आमदार म्हणून निवडून येणे सुद्धा अवघड होणार आहे. (Shiv Sena Worli Former corporator Santosh Kharat in Shinde group)

संतोष खरात यांचे घराघरांत असलेल्या लोकसंबंधांबद्दल खुद्द आदित्य ठाकरे यांनाही मोठे कौतुक होते. आदित्य ठाकरेंचा संतोष खरात यांच्यावर मोठा विश्वास होता. परंतु वरळीतील शिवसेनेतील अंतर्गत गटबाजीला संतोष खरात कंटाळले होते.

सुनील शिंदे, सचिन अहिर हे शिवसेनेचे दोन आमदार वरळीमध्ये आहेत. आशिष चेंबूरकर हे माजी नगरसेवक आहेत. या सगळ्यांनी वरळीमध्ये गटबाजीची बजबजपुरी करून ठेवली आहे. वरळीमध्ये मोठे मॉल उभे राहिले आहेत. वरळीतील बीडीडी चाळींचा पुनर्विकास होत आहे. अनेक मोठमोठ प्रकल्प सुरू आहेत. त्यामुळे वरळीत बिल्डर, व्यावसायिक मोठ्या संख्येने अवतरले आहेत. असा धनदांडग्यासोबत हातमिळवणी करायची आणि सामान्य वरळीकर लोकांना वाऱ्यावर सोडायचे हे उद्योग वरळीतील प्रस्थापित शिवसेनेच्या नेत्यांनी केले आहेत. स्वतःचे खिसे भरायचे, पण गोरगरीब मराठी लोकांसाठी हे काहीच करायचे नाही, असे वरळीतील शिवसेना नेत्यांची स्थिती आहे. त्यातच गटबाजी आणि अंतर्गत लाथाळ्या यामुळे संतोष खरात वैतागले होते.

संतोष खरात यांनी आदित्य ठाकरे यांच्यासोबत काडीमोड घेतल्यामुळे आदित्य ठाकरेंना व्यक्तिगत मोठा फटका बसणार आहे. गोरगरीबांच्या घराघरात पोहोच असलेला माणूस हातातून निसटल्यामुळे आदित्य ठाकरेंची विधानसभा निवडणूक सुद्धा अवघड होवून बसेल असे सूत्रांनी सांगितले.
दुसऱ्या बाजूला मतदारांमध्ये लोकप्रिय असलेल्या संतोष खरात यांच्यामुळे एकनाथ शिंदे यांना वरळीत राजकारण करणे आणखी सोपे होणार आहे. सचिन अहिर, सुनील शिंदे व आशिष चेंबूरकर यांच्या एकत्रित ताकदीपेक्षाही संतोष खरात यांची एकट्याची ताकद मोठी आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांना मोठा फायदा होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

दरम्यान, संतोष खरात हे एकनाथ शिंदे गटात दाखल झाल्याचा धसका आदित्य ठाकरे यांनीही घेतला आहे. त्यांनी तातडीने शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केल्याचे सूत्रांनी सांगितले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी