29 C
Mumbai
Thursday, August 4, 2022
घरमुंबईमुंबई महानगर पालिकेवर शिवसेनेचाच भगवा फडकणार - किशोरी पेडणेकर

मुंबई महानगर पालिकेवर शिवसेनेचाच भगवा फडकणार – किशोरी पेडणेकर

टीम लय भारी

मुंबई :महानगर पालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना आगामी निवडणुकीत शिवसेनाच जिंकणार याची खात्री आहे. आज प्रसार माध्यमांसमोर बोलतांना त्या म्हणाल्या, की आगामी निवडणुकीमध्ये मुंबई महानगर पालिकेवर शिवसेनेचाच भगवा झेंडा फडणार आहे.

राज्यात सुरु असलेल्या राजकीय सुनामी संदर्भात किशोरी पेडणेकर यांनी आज प्रतिक्रिया दिली. दर 15 वर्षांनी सुनामी येत असते. आशा अनेक सुनामी आम्ही पाहिल्या आहे. त्यानंतर झालेली पडझड आम्ही नव्याने उभी केली आहे. यावेळी देखील आम्ही शिवसेनेला नव्याने उभी करु असा विश्वास त्यांनी यावेळी दाखवला. त्यामुळे या वर्षी महापालिकेवर शिवसेनेचा भगवाच फडकणार आहे.

माध्यम प्रतिनिधींनी किशोरी पेडणेकरांना दिपक केसरकरांविषयी प्रश्न विचारला असता त्या चांगल्याच आक्रमक झाल्या. दिपक केसरकर हे ‘उडता पंछी‘ आहे. इथून उठायचं तिथे बसायचं. हे त्यांचं सुरुच असते. आमच्या सारख्या निष्ठावान शिवसैनिकांना त्यांच्या बददल विचारु नका असेही त्यांनी यावेळी ठणकावून सांगितले.राज्यात सध्या राजकीय वादळं सुरु आहे. शिवसेनेतील 50 आमदारांनी बंडखोरी केली. त्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. मात्र अनेक निष्ठावंत शिवसैनिक आजही उध्दव ठाकरें सोबत उभे आहेत. त्यामुळे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात शिवसेना पुन्हा उभारी घेईल याची खात्री अनेक शिवसैनिकांना आहे.

हे सुध्दा वाचा:

‘सुशांत सिंह’ मृत्यू प्रकरणी ‘रिया’ला होऊ शकते 10 वर्षांची शिक्षा

बंडोबांचे सत्र संपेना! शितल म्हात्रे शिंदे गटात सामील

बंडखोरी करुनही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी घेतले बाळासाहेबांचे दर्शन

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!