28 C
Mumbai
Thursday, March 28, 2024
HomeमुंबईEknath Shinde : शिवडी-न्हावाशेवा सागरी मार्ग लवकर मार्गस्थ होणार, एकनाथ शिंदेंची घोषणा

Eknath Shinde : शिवडी-न्हावाशेवा सागरी मार्ग लवकर मार्गस्थ होणार, एकनाथ शिंदेंची घोषणा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आज न्हावा शेवा प्रकल्पाची पाहणी केली. हा प्रकल्प लवकरच कार्यन्वीत होईल अशी घोषणा त्यांनी यावेळी केली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आज न्हावा शेवा प्रकल्पाची पाहणी केली. हा प्रकल्प लवकरच कार्यन्वीत होईल अशी घोषणा त्यांनी यावेळी केली. यावेळी घेण्यात आलेल्या पत्रकार पर‍िषदेमध्ये त्यांनी या प्रकल्पाची माहिती दिली. या भागातील लोकांना या प्रकल्पामुळे खूप सोई उपलब्ध होणार आहेत. या भागातील लोकांसाठी नवीन विमानतळ तसेच जेएनपीटी असेल असेही त्यांनी यावेळी सांग‍ितले. एमटीएचएल प्रकल्प हा इथल्य लोकांना सोयीस्कर ठरेल. हा प्रकल्प 22 किमीचा आहे. हा सर्वात मोठा सी लिंकचा प्रकल्प आहे. या प्रकल्पामुळे प्रदुषणात घट होईल. यामुळे इंधन आणि वेळेची देखील मोठी बचत होईल.

या प्रकल्पामुळे मुंबई ते रायगड हा प्रवास दोन तासात पार करता येईल. 10‍0 किलोमीटरचे अंतर 1 तासांमध्ये पार करता येईल. वाहतूक कोंडी झाल्यास मात्र या प्रवासाला जास्त वेळा लागू शकतो. या प्रकल्पामुळे मुंबईमधला माणूस 20 मिनीटांमध्ये रायगड मधील चिर्ले येथे पोहोचू शकतो. वेळ, पैसा, श्रम, इंधन याची बचत होईल तसेच प्रदूषण कमी होण्यास देखील या प्रकल्पामुळे मदत होणार आहे.

हे सुद्धा वाचा

India-South Africa T-20 Series : दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय क्रिकेट संघाची निवड

Garba Song : गरब्यासाठी फाल्गुनी पाठक यांचे नवे गाणे रिलीज

T-20 : भारत-ऑस्ट्रेलिया टी-20 सामन्यापूर्वीच ऑस्ट्रेलियाचे तीन दिग्गज खेळाडू संघाबाहेर

या प्रक्ल्पामुळे मुंबईकरांना द‍िलासा मिळणार आहे. या मार्गावरून सुमारे 1 लाख वाहने रोज प्रवास करू शकतील इतकी याची क्षमता असेल. हा एक प्रकारे मोठा प्रकल्प आहे. तो लोकांना नक्कीच आवडेल. या प्रकल्पाचे लवकरच लोकापर्ण करणार असल्याची घोषणा देखील त्यांनी यावेळी केली. एमएमआरडीए तशी तयारी देखील करत आहे. जी कामे रखडली आहेत. ती वेळेत पूर्ण करण्याचा सरकारचा प्रयत्न असेल असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रकल्पांच्या कामाचा धडाका सुरू केला आहे. आपल्या काळात जास्तीजास्त कामे करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. नरेंद्र मोंदीप्रमाणे ते सातत्याने अनेक प्रकल्पांसाठी वेळ देत आहेत. कामे करुन लोकांची मने जिंकण्याचा त्यांचा हा प्रयत्न असल्याची चर्चा सद्या राज्यात सुरु आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी