29 C
Mumbai
Wednesday, August 3, 2022
घरमुंबईपालघरमध्ये शिवसेनेला झटका, सचिन गुंजाळ यांचा भाजपात जाहीर प्रवेश

पालघरमध्ये शिवसेनेला झटका, सचिन गुंजाळ यांचा भाजपात जाहीर प्रवेश

टीम लय भारी

पालघर : पालघर जिल्हा शिवसेना प्रमुख वसंत चव्हाण यांना झटका त्यांच्या सख्ख्या भाच्यानेच झटका दिलाय. ऐन निवडणुकीच्या तोंडावर नाराज शिवसेना नेत्यांचं भाजपमध्ये सध्या जोरदार इनकमिंग सुरू आहे. वसंत चव्हाण यांच्या सख्ख्या भाच्याने भाजपात जाहीर प्रवेश केलाय. (ShivSena in Palghar, Sachin Gunjal’s public entry in BJP)

आज मनोर येथे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख वसंत चव्हाण यांचा खास पाठीराखा आणि सख्खा भाचा सचिन गुंजाळ यांनी जिल्हा संघटन सरचिटणीस संतोष जनाठे यांच्या प्रयत्नाने भाजपाचे जिल्हा अध्यक्ष नंदकुमार पाटील साहेब यांच्या हस्ते भारतीय जनता पार्टीेत जाहीर प्रवेश केला .या प्रवेशाने मनोर शिवसेना व जिल्हा प्रमुख वसंत चव्हाण यांना आगामी ग्रामपंचायत निवडणुकीत मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

या वेळेस ज्येष्ठ नेते बाबाजी काठोले,जिल्हा सरचिटणीस सुशील औसरकर,जिल्हा ओबीसी आघाडी अध्यक्ष संदीप पावडे,नंदन वर्तक,संतोष गिंभल,संतोष लोखंडे,तानाजी घोलप,हर्षद पाटील,विजय पाटील,बबन वझे,सुभाष काळे,मंदार केले,अर्चना पाटील,वंदना चंपानेरकर,पूजा मोहिते,अपर्णा एडवणकर,अजय गुप्ता,किशोर खडके, रशिराम चोथे,मुन्ना मिश्रा, प्रतीक्षा बोरकर,मानसी भानुशाली,सौ लोखंडे,सौ चाफेकर,सौ घोलप,योगेश भूयाल,दामोदर कासट,मंगेश गोंड,विश्वास दुतकर, रंजिता बारी आदी उपस्थित होते.


हे सुद्धा वाचा : 

 

शिवसेना, राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री होणार; कॉंग्रेस सतरंज्या उचलणार; मनसेचा टोला

वाई जिल्हा सातारा येथे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आणि डॉ श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या कार्यालयाचे उदघाटन

रक्ताचा तुटवडा दूर करण्यासाठी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षातर्फे रक्तदान

शिवसेना उपनेते रघुनाथ कुचिक यांच्यावर बलात्काराचे आरोप करणाऱ्या तरुणीचा गौप्यस्फोट

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!