28 C
Mumbai
Friday, March 29, 2024
Homeमुंबईशिवसेनेत सतत कारस्थाने करणाऱ्या शंभूराज देसाईंना पक्षाची नोटीस

शिवसेनेत सतत कारस्थाने करणाऱ्या शंभूराज देसाईंना पक्षाची नोटीस

टीम लय भारी

मुंबई : शंभूराज देसाई हे ‘महाविकास आघाडी’ सरकारमध्ये राज्यमंत्री आहेत. परंतु अत्यंत पाताळयंत्री व स्व:पक्षाविरोधात सतत कारस्थाने करण्याचे उद्योग ते करीत असतात. गेल्या काही वर्षांत त्यांनी असे उद्योग सतत केले आहेत. किंबहूना शिवसेनेतील इतर नेत्यांच्या विरोधात कारस्थाने करण्यासाठी त्यांनी यापूर्वी सुद्धा एकनाथ शिंदे यांचा वापर केला होता. सरकारमधून बाहेर पडण्यासाठी शिंदे यांना भरीस घालण्याचा उद्योग पाताळयंत्री देसाई यांनीच केल्याचा दाट संशय आहे.

या पार्श्वभूमीवर शिवसेनेने पहिली नोटीस देसाई यांना बजाविली आहे. पक्षाने आमदारांच्या बैठकीचे आयोजन केले आहे. या बैठकीसाठी उपस्थित राहण्याची नोटीस देसाई यांना बजाविण्यात आली आहे. यामध्ये वर्षा बंगल्यावर संध्याकाळी होणाऱ्या शिवसेनेच्या तातडीच्या बैठकीत शंभूराज देसाई यांना उपस्थित राहण्यास सांगितले. जर ते उपस्थित राहिले नाही तर ते स्वेच्छेने पक्षाचे सदस्यत्व सोडण्याचा तयारीत असल्याचे स्पष्ट यामध्ये नमूद करण्यात आले आहे. याशिवाय शंभूराज देसाई यांच्यावर भारतीय संविधानातील सदस्यांच्या अपात्रते संदर्भात असलेल्या तरतुदीनुसार कारवाई करण्याचे आदेश देखील या पत्राद्वारे देण्यात आले आहेत.

यापूर्वी देवेंद्र फडणवीस सरकार असताना त्यांनी आपल्या पक्षाच्या विरोधात कारस्थाने केली होती. त्यावेळी एकनाथ शिंदे, रामदास कदम, दिवाकर रावते, सुभाष देसाई, रवींद्र वायकर असे अनेक शिवसेनेचे मंत्री त्या सरकारमध्ये होते. पण एकनाथ शिंदे वगळता अन्य सगळे मंत्री कुचकामी आहेत, अशी माहिती ते मीडियाला पुरवायचे.

एकदा तर त्यांनी विधीमंडळ अधिवेशनाच्या दरम्यान सर्व आमदारांना स्व:पक्षातील मंत्र्यांच्या विरोधात भडकावून दिले होते. विधानभवनातील पक्षाच्या कार्यालयात त्यांनी सगळ्या आमदारांची बैठक बोलाविली होती. एकनाथ शिंदे वगळता सर्व शिवसेना मंत्र्यांची हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी या आमदारांच्या गळी उतरवली होती. तशा बातम्याही त्यांनी वृत्तपत्रांत छापून आणल्या होत्या.

त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी तातडीने सर्व आमदारांना शिवसेना भवनमध्ये पाचारण करून त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला होता.
या कारस्थानांचा फायदा म्हणून शंभूराज देसाई यांना उद्धव ठाकरे मंत्रीमंडळात राज्यमंत्रीपद मिळाले. पण तरीही त्यांचे पोट भरले नाही. त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याही विरोधात पक्षातील आमदारांना भडकविण्याचे उद्योग केले. आता पक्ष फोडण्याची कारस्थाने ज्यांनी केली, त्यात शंभूराज देसाई यांचे स्थान वरचे आहे.

भविष्यात यदाकदाचित उद्धव ठाकरे यांना एकनाथ शिंदे यांची नाराजी दूर करण्यात यश मिळाले तरी, त्यांनी शंभूराज देसाईसारख्या भंपक लोकांना त्यांची योग्य जागा दाखवून द्यायला हवी, अशी भावना व्यक्त करण्यात येत आहे.

हे सुद्धा वाचा :

नितीन देशमुख म्हणाले, गुजरात पोलिसांनी मला हात – पाय धरून गाडीत कोंबले, एकनाथ शिंदेंनी फसविले

एकनाथ शिंदेंनी सांगितले, नितीन देशमुखांना पळविल्याचे कारण

सत्ता हातातून जात असताना ‘महाविकास आघाडी’ सुस्तचं

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी