29 C
Mumbai
Monday, September 11, 2023
घरमुंबईठाण्यात लिफ्ट कोसळून 6 कामगारांचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी

ठाण्यात लिफ्ट कोसळून 6 कामगारांचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी

बाळकुम परिसरात असलेल्या रुणवाल आयरीन या ४० मजली इमारतीवरून लिफ्ट कोसळून सहा कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर या अपघातात दोन कामगार गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून पोलीस याप्रकरणी अधिक चौकशी करत आहेत.

बाळकुम येथील नारायणी शाळेच्या बाजूला रुणवाल आयरीन या नुकतेच बांधकाम पूर्ण झालेल्या ४० मजली इमारतीच्या छतावर वॉटरप्रूफिंगचे काम सुरू होते. हे काम संपवून कामगार खाली येत असताना लिफ्टचा दोर तुटल्याने हा अपघात घडला. घटनेची माहिती प्रत्यक्षदर्शींनी बाळकुम अग्निशमन दलाला कळवली. तातडीने बाळकुम अग्निशमन दलाचे स्टेशन अधिकारी ओमकार वैती घटनास्थळी टीमसह पोहोचले. तसेच या घटनेची माहिती मिळताच स्थानिक माजी नगरसेवक संजय भोईर यांनी दुर्घटनास्थळी धाव घेत बचाव कार्यात मदत केली. बचाव पथकाने लिफ्टमध्ये अडकलेल्या कामगारांना बाहेर काढले.

हे ही वाचा 

मुख्यमंत्र्यांच्या मतदार संघात बनावट पनीरचा धंदा तेजीत!

एअर होस्टेसची हत्या करणाऱ्या आरोपीची पोलीस कोठडीतच आत्महत्या

कल्याण -डोंबिवलीचे राजकारण कूस बदलणार; खासदारकीसाठी कथोरे चर्चेत, महापौर पदावर भाजपचा डोळा

या दुर्घटनेत पाच कामगारांचा जागीच मृत्यू झाला होता. तर गंभीर जखमी दोन कामगारांना खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले. ही दुर्घटना नेमकी कशी घडली याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी