32 C
Mumbai
Friday, April 19, 2024
HomeमुंबईG-20 च्या बैठकीमुळे मंबईतील रस्ते 16 डिसेंबर पर्यंत बंद; पाहा काय आहेत...

G-20 च्या बैठकीमुळे मंबईतील रस्ते 16 डिसेंबर पर्यंत बंद; पाहा काय आहेत पर्यायी मार्ग

मुंबईतील ताज हॉटेलमध्ये मंगळवारी (13 डिसेंबर) होणाऱ्या G-20 बैठकीच्या सुरक्षा व्यवस्थेच्या दृष्टीने वाहतूक सल्लागार जारी करण्यात आला आहे. ऍडव्हायझरीनुसार दक्षिण मुंबईतील अनेक रस्ते 12 डिसेंबर ते 16 डिसेंबरपर्यंत बंद राहतील.

देशभरात सध्या G-20 विषय जोरदार चर्चेत आहे. याच G-20 संदर्भात एक महत्त्वाची बैठक मुंबईतील प्रतिष्ठित ताज हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आली आहे. याच बैठकीमुळे सामान्य मुंबईकरांना नाहक त्रास सहन करावा लागणार आहे. मुंबईतील ताज हॉटेलमध्ये मंगळवारी (13 डिसेंबर) होणाऱ्या G-20 बैठकीच्या सुरक्षा व्यवस्थेच्या दृष्टीने वाहतूक सल्लागार जारी करण्यात आला आहे. ऍडव्हायझरीनुसार दक्षिण मुंबईतील अनेक रस्ते 12 डिसेंबर ते 16 डिसेंबरपर्यंत बंद राहतील.

हे मार्ग पूर्णपणे बंद राहणार आहेत
मुंबई वाहतूक पोलिसांनी जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे की, 13 डिसेंबर 2022 रोजी G-20 परिषदेचे सन्माननीय सदस्य हॉटेल ताज पॅलेसला भेट देत आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने छत्रपती शिवाजी महाराज मार्ग, पु.रामचंदानी मार्ग, बी.के. बोमन बेहराम मार्ग, आदम स्ट्रीट आणि महाकवी भूषण मार्गावरील वाहतुकीवर परिणाम होणार आहे. हे मार्ग आपत्कालीन वाहने वगळता सर्व वाहनांसाठी पूर्णपणे बंद असतील.

हे सुद्धा वाचा

के एल राहुल कर्णधार अन् पुजारा उपकर्णधार; अशी असेल बांग्लादेश विरुद्ध पहिल्या कसोटीत भारताची प्लेइंग 11

दररोज नारळाचे पाणी पिल्याने दूर होतात अनेक आजार; वाचा सविस्तर

भारताच्या करदात्यांसाठी आनंदाची बातमी ; आता 5 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर करातून सूट मिळण्याची शक्यता

या मार्गावरून जाणारे प्रवासी त्यांच्या प्रवासासाठी पर्यायी मार्गाचा वापर करू शकतात.
-मंगळवारी, छत्रपती शिवाजी महाराज मार्गावरून प्रवास करणारे प्रवाशी रीगल सर्कल येथून महाकवी भूषण मार्ग – ताज पॅलेस – बोमन बेहराम रोड – अल्वा -चौक – इलेक्ट्रिक हाउस – एसबीएस रोड मार्गे दक्षिणेकडे जाऊ शकतात.
-पी. रामचंदानी मार्गाचे प्रवासी आझमी रोड – भाभी भंजन मंदिर – एसबीएस रोड वापरू शकतात.
-बी.के. बोमन बेहराम मार्गावरील प्रवासी बोमन बेहराम रोड – अल्वा चौक – इलेक्ट्रिक हाउस – एसबीएस रोड वापरू शकतात.
-ऍडम स्ट्रीट वापरणारे प्रवासी बोमन बेहराम – अल्वा चौक – इलेक्ट्रिक हाउस – एसबीएस रोड वापरू शकतात.
-महाकवी भूषण मार्गाचे प्रवाशी रिगल सर्कल एसबीएस रोड मंडलिक रोड – बोमन बेहराम रोड – अल्वा चौक – इलेक्ट्रिक हाउस एसबीएस रोड वापरू शकतात.

काय आहे G-20?
G-20 ला ग्रुप ऑफ ट्वेंटी असेही म्हणतात. हा युरोपियन युनियन आणि 19 देशांचा अनौपचारिक गट आहे. त्याचे नेते दरवर्षी G-20 शिखर परिषदेत एकत्र येतात आणि जागतिक अर्थव्यवस्थेला पुढे कसे आणायचे यावर चर्चा करतात. त्याची स्थापना 1999 साली झाली. तसेच, हा एक मंत्री मंच आहे जो G-7 ने विकसित आणि विकसनशील दोन्ही अर्थव्यवस्थांच्या सहकार्याने स्थापन केला होता.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी