34 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
Homeमुंबईआता महिलांसाठी बस तिकीट भाड्यात 50 टक्के सवलत; महाअर्थसंकल्पातील महिला विशेष योजना

आता महिलांसाठी बस तिकीट भाड्यात 50 टक्के सवलत; महाअर्थसंकल्पातील महिला विशेष योजना

उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis) यांनी आज गुरुवारी (दि. 9) राज्याचा 2023-24 चा अर्थसंकल्प सादर केला. दरम्यान काल नुकताच जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. त्या अनुषंगाने मुलींच्या सक्षमीकरणाकरता लेक लाडकी, माता सुरक्षित घर सुरक्षित, शक्तीसदन योजना अशा अनेक नव्या योजनांचा यंदाच्या अर्थसंकल्पात समावेश करण्यात आला. दरम्यान राज्य सरकारने महिलांसाठी मोठी घोषणा केली आहे. मुख्यतः आता महिलांना एसटी प्रवासांत 50 टक्के सूट मिळणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज अर्थसंकल्पीय भाषणात ही योजना जाहीर केली आहे.

यंदा राज्य सरकारने महिलावर्गाला विशेष लक्ष्य करत काही घोषणा केल्या आहेत. तर, लवकरच चौथे सर्वसमावेशक महिला धोरण जाहीर करणार असल्याचंही म्हटलं आहे. तर, महिला सुरक्षा, सुविधाजनक प्रवासासाठी महिला केंद्रीत पर्यटन धोरण राबवण्यात येणार असून राज्य परिवहन महामंडळाच्या बससेवेतील तिकिटदरात महिलांना आता 50 टक्के सरसकट सवलत दिली जाणार आहे.

राज्य सरकारने महिलांसाठी अनेक योजना यंदाच्या अर्थसंकल्पात राबवल्याचे दिसत आहे. महिला बचत गटांच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यात बांबू क्लस्टर व कोल्हापूर जिल्ह्यात चप्पल क्लस्टर राबवण्यात येणार आहे. तसंच, मुंबईत महिला युनिट मॉलची स्थापना करण्यात येत आहे. माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियानात 4 कोटी महिला- मुलींची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे.

दरम्यान, दोन योजना एकत्र करुन शक्तीसदन ही नवीनतम योजना लागू करण्यात येणार आहे. शहरी भागात नोकरीसाठी आलेल्या महिलांसाठी केंद्राच्या मदतीने 50 वसतीगृहांची निर्मिती करण्यात येणार आहे. अडचणीतील महिलांसाठी, लैंगिक शोषणापासून मुक्त केलेल्या महिलांसाठी, कौटुंबिक समस्याग्रस्त महिलांसाठी स्वाधार आणि उज्वला या दोन योजनांचे एकत्रिकरण करुन केंद्राच्या मदतीने ‘शक्तीसदन’ ही नवीन योजना राबवण्यात येणार आहे. या योजनेत पीडित महिलांना आश्रय, विधी सेवा, आरोग्यसेवा, समुपदेशन इत्यादी सेवा उपलब्ध करुन देणार.

हे सुद्धा वाचा : 

यंदाच्या अर्थसंकल्पात महिलांसाठी ‘या’ विशेष तरतुदी

महाराष्ट्र अर्थसंकल्प 2023 : ‘या’ आहेत महत्त्वाच्या ठळक बाबी

अवघ्या 1 रुपयात पिक विमा, शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्षाला 12 हजार; शिंदे-फडवणवीस सरकारच्या अर्थसंकल्पात मोठी घोषणा

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी