32 C
Mumbai
Friday, April 19, 2024
Homeमुंबईएसटी संप काळात मृत्यू झालेल्या १२४ कर्मचाऱ्यांच्या वारसांना मिळणार नोकरी

एसटी संप काळात मृत्यू झालेल्या १२४ कर्मचाऱ्यांच्या वारसांना मिळणार नोकरी

एसटी महामंडळाचे शासनात विलिनीकरण करावे यासाठी जे आंदोलन  (ST strike) झाले, त्यात प्राण गमविलेल्या १२४ एसटी कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना एसटी महामंडळात नोकरी देण्याबाबतचे परिपत्रक एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकिय संचालक शेखर चन्ने यांनी काढले आहे. याबाबत कष्टकरी जनसंघ संघटनेचे अध्यक्ष अॅड. गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte)  यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की, संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष यांच्याकडे आम्ही केलेल्या मागणीला मोठे यश आले आहे. (ST strike during died 124 employees will get jobs their heir)

अॅड. गुणरत्न सदावर्ते म्हणाले की, एसटी संपात कष्टकऱ्यांनी प्राण गमावले. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या पक्षाच्या सरकारने संपकाळात ज्या 124 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला त्यांना न्याय दिला नाही. मात्र त्यांच्या मरणोपरांत कारवाया मागे घेत मृतांच्या वारसांना नोकरी देण्याचे परिपत्रक एसटी महामंडळाने जारी केले, हे कष्टकरी जनसंघाचे हे मोठे यश आहे. विलिनीकरणाच्या मागणीसाठी संप पुकारलेल्या कर्मचाऱ्यांना नोकरीत सामावून घेण्यासाठी कष्टकरी जनसंघ संघटनेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष शेखर चन्ने यांच्याकडे साकडे घातले होते. आता आमच्या मागणीला यश आले असल्याचे सदावर्ते म्हणाले.

हे सुद्धा वाचा

गुंगीचे औषध देऊन 120 महिलांवर बलात्कार करणाऱ्या तांत्रिक जिलेबी बाबाला 14 वर्षांच्या जन्मठेपेची शिक्षा

आता नवीन काय ते सायंकाळी छापेमारी संपल्यानंतर कळेल : हसन मुश्रीफ

संतापजनक : शाहरुख खानच्या बायकोने मराठीची केली ऐसीतैशी!

एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलिनीकरण करण्याच्या मागणीसाठी २८ ऑक्टोबर २०२१ रोजी एसटी कर्मचाऱ्यांनी नियमबाह्य बेमुदत संप पुकारला होता. यावेळी संपात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांना कर्तव्यावर गैरहजेरीच्या कारणास्तव बडतर्फ अथवा निलंबित करण्यात आले होते. ज्या कर्मचाऱ्यांनी निलंबनाविरोधात प्रथम अर्ज सादर करण्यापुर्वी अथवा सदर अर्जावर निर्णय होण्यापुर्वीच त्यांचे निधन झाले आहे, असे कर्मचारी सेवा काळातच मृत्यू पावले आहेत, असे गृहित धरून, सदर मृत कर्मचाऱ्यांच्या वारसाला अनुकंपा तत्वावर नोकरी देण्यात येणार आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी