33 C
Mumbai
Wednesday, May 17, 2023
घरमुंबईबेकायदेशीर भंगाराच्या गोदामात सापडला शिवाजी महाराजांचा चोरीला गेलेला पुतळा

बेकायदेशीर भंगाराच्या गोदामात सापडला शिवाजी महाराजांचा चोरीला गेलेला पुतळा

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा अमेरिकेतील कॅलिफोर्नियामधील सान होसे शहरातील ग्वादालूपे रिव्हर पार्कमधील कांस्य धातूचा अश्वारूढ पुतळा काही दिवसांपूर्वी चोरीला गेला होता. हा पुतळा येथील एका कुप्रसिद्ध भंगाराच्या गोदामात पोलिसांना आढळून आला आहे. बेकायदेशीर कृत्यांसाठी या भंगाराच्या गोदामाचा वापर करण्यात येतो, अशी माहिती मर्क्युरी न्यूज या वृत्तपत्राने दिली आहे. १९९९ साली पुणे शहराकडून हा पुतळा भेट देण्यात आला होता. घड्याचये खूर करवतीने कापून वरचा अश्वारूढ पुतळा चोरट्यांनी पळवला होता. २०० किलो वजनाचा हा पुतळा ९ फेब्रुवारी रोजी या भंगाराच्या गोदामात आढळून आला. (Stolen statue of Sivaji Maharaj found in illegal scrap warehouse)

Stolen statue of Sivaji Maharaj found in illegal scrap warehouse

हे गोदाम बेकायदेशीर कृत्यांसाठी कुप्रसिद्ध आहे. २०२१ सालचे कॅटलिस्ट कॉन्व्हर्टर चोरी प्रकरण, २०१० मधील एक दशलक्ष डॉलर्सचा घोटाळा या प्रकरणात या भंगार गोदामाचे नाव पुढे आले होते. तसेच २००७ साली चोरीला गेलेले धातूचे साहित्य शोधण्यासाठी पोलिसांनी या गोदामामध्ये स्टिंग ऑपरेशन केले होते. या पुतळ्याबद्दल पोलिसांना खबऱ्यांकरवी माहिती मिळाली होती तसेच या गोदामातील कामगारांची चौकशी केली असता ही बाब उघडकीस आली. या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नाही. याबाबत कामगारांनी अधिक माहिती दिली नसून पोलिसांचा तपास सुरु आहे.

२९ जानेवारीला एक महिला आणि दोन पुरुष हा पुतळा घेऊन या गोदामात आले होते. सान ‘होसे पुणे सिस्टर सिटी ऑर्गनायझेशन’चे अध्यक्ष सुनील केळकर यांनी याबाबत आनंद व्यक्त केला आहे. पण घोड्याचे पाय कापल्यामुळे या पुतळ्याची पुनर्स्थापना कशी करायची, ही समस्या निर्माण झाली आहे. आमच्या भारतीय बांधवांसाठी या पुतळ्याचे भावनिक महत्व होते. तो त्यांच्या अस्मितेचा विषय आहे, अशी प्रतिक्रिया सान होसेचे महापौर मॅट महान यांनी दिली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा चोरीला जाण्याची हे दुसरी वेळ आहे.

हे सुद्धा वाचा

लिव्ह-इन-रिलेशनशिपमधील हत्यांचे सत्र थांबता थांबेना… आणखी एका परिचारिकेची हत्या

आणखी एक श्रद्धा वालकर : प्रेयसीची हत्या करून मृतदेह ढाब्यातील फ्रिजमध्ये ठेवला

हृदयस्पर्शी: IPS लेकीने केला DGP वडिलांना सॅल्यूट; व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी