30 C
Mumbai
Wednesday, April 24, 2024
Homeमुंबईगायींची कत्तल थांबली तरच पृथ्वीवरील प्रश्न सुटतील; गुजरातमधील न्यायाधीशांचे मत

गायींची कत्तल थांबली तरच पृथ्वीवरील प्रश्न सुटतील; गुजरातमधील न्यायाधीशांचे मत

गुजरातमधील जिल्हा न्यायाल्याने महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गायींची बेकायदेशीर तस्करी करणाऱ्या २२ वर्षीय तरुणाला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. गोहत्या थांबली तर पृथ्वीवरील सर्व समस्या सुटतील, असे मत न्यायाधीश समीर विनोदचंद्र व्यास यांनी सुनावणीदरम्यान व्यक्त केले. (Stop Cow Slaughter all problems on this Earth will be Resolved ) “लाईव्ह लॉ” आणि “बार अँड बेंच” (Live Law) and (Bar and Bench) या कायदेविषयक वृत्त संकेतस्थळाने हे वृत्त प्रसारित केले आहे. गुजरातमधील तापी न्यायालयात या प्रकरणी सुनावणी सुरु होती. पृथ्वीवरील सर्व समस्यांना गोहत्येस जबाबदार धरून त्या थांबल्या तर सर्व प्रश्न संपतील, असे मत न्यायधीश समीर व्यास यांनी व्यक्त केले आहे.

ऑगस्ट २०२० मध्ये मोहम्मद आमिन याला १६ गायींची बेकायदेशीर तस्करी करण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. या गायीच्या वाहतुकीदरम्यान त्याने गायींना बसण्यासाठी पुरेशी व्यवस्था केली नाही, तसेच त्यांना खाण्या-पिण्याची सोयही केली नसल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला आहे. जन्मठेपेसोबतच त्याला पाच लाख रुपयांचा दंडदेखील ठोठावण्यात आला आहे.

हे सुद्धा वाचा

काय म्हणता ! जिल्हा परिषदेच्या शाळेत फक्त एकच विद्यार्थी…

लोकांनी तक्रार केली म्हणून गझनीने सोमनाथ मंदिर तोडले

BMC बसवणार ५००० सॅनिटरी पॅड डिस्पेंसर मशिन्स ; झोपडपट्टी भागांवर लक्ष केंद्रित

न्यायाधीश समीर व्यास म्हणाले, “ज्या दिवशी पृथ्वीवर गायीच्या रक्ताचा एक थेंबही सांडणार नाही त्या दिवशी या पृथ्वीवरील सर्व समस्या सुटतील आणि पृथ्वीचे कल्याण होईल. ज्या घरांमध्ये गाईचे शेण सारवले जाते त्या ठिकाणी आण्विक किरणणोत्सर्ग होत नसल्याचे विज्ञानाने सिद्ध झाले आहे. गोमूत्रामुळे कित्येक असाध्य आजारही बरे होतात. गाय हे धर्माचे प्रतीक आहे.धर्माचा जन्म गायीतूनच झाला आहे. कारण धर्म वृषभच्या रुपात आहे आणि गायीच्या मुलाला वृषभ म्हणतात. या निकालात न्यायाधीश समीर व्यास यांनी सध्या अस्तित्वात असलेल्या गोहत्याबंदी कायद्यातील स्वरूपाबाबत असमाधान व्यक्त केले आहे.

गाय नाराज असेल तर संपत्ती नष्ट होते
सध्याची परिस्थिती पाहिल्यास हे स्पष्ट होईल की, ७५ टक्के गोधन नष्ट झाले आहे अथवा ते करण्यात आले आहे. २५ टक्के देखील शिल्लक राहिले नाही, असे निकालात म्हटलं आहे. न्यायाधीश व्यास यांनी म्हटलं आहे, “ जिथे गाय सुखी राहते तिथे धन आणि संपत्ती मिळते. आणि ज्या ठिकाणी गाय दुःखी असते, तेथून धन आणि संपत्ती नाश पावते.”

गायीचं अस्तित्व संपलं तर ब्रह्मांडही संपेल
न्यायाधीश समीर व्यास यांनी ब्रह्मांडाचे नाते गायीच्या अस्तित्वाशी जोडले आहे. त्यासाठी त्यांनी संस्कृतमधील एक श्लोक नमूद केला आहे. ते म्हणाले, “गायीचं अस्तित्व संपलं तर हे ब्रह्मांडही संपेल. वेदांच्या सर्व सहा भागांची निर्मिती ही गायीमुळेच झाली आहे.”

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी