राज्यात काही दिवसांपासून शिवसेना ठाकरे गटाच्या १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत सुनावणी प्रक्रियेत दिरंगाई होताना दिसते. आज सर्वोच्च न्यायालायात याबाबत सुनावणी होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर सुनावणीची तारीख पुढे घेत आहेत. यामुळे काही दिवसांपासून या सुनावणीसाठी वेळ दवडला जातोय. शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गट यांची एकत्र सुनावणी घेण्यासाठी शिंदे गटाने विरोध केला होता. मागील आठवड्यात या सुनावणीबाबत तारीख दिलेली होती. त्या दिवशी कोर्टाने विधानसभा अध्यक्षांवर ताशेरे ओढले. अध्यक्षांनी यावर वेळापत्रक तयार केले, मात्र कोर्टाने ते अमान्य केले आहे.
१३ तारखेला झालेल्या सुनावणीबाबत वकील सिद्धार्थ यांनी माहीती दिली आहे. ते म्हणाले की, १३ तारखेला झालेल्या सुनावणीत पुढील तारीख १७ ऑक्टोबर दिली आहे. यावेळी त्यांना वेळापत्रक सादर करण्यासाठी सांगितले आहे. दरम्यान हि सुनावणी दुपारी १२ नंतर किंवा जेवनानंतर होईल. तर मागील झालेल्या सुनावणीत अध्यक्षांना नविन वेळापत्रक सादर करा अन्य़था कोर्ट दोन महिन्याचा कालावधी तुमच्यावर लादू शकते, आज कोर्टाच्या सुनावणीसाठी सॅलिसिटर जनरल तुषार मेहता हे उपस्थीत राहणार आहेत. यावेळी ते वेळापत्रक कोर्टात जाहीर करणार आहेत. यावर आता कोर्ट काय म्हणेल, हे पाहणे गरजेच आहे.
हेही वाचा
राज्य सरकार लवकरच भरणार 30 हजार शिक्षकांची पदे
ऑस्ट्रेलियाचे जबरदस्त कमबॅक, श्रीलंका स्पर्धेबाहेर जाण्याची चिन्हे
बेपत्ता मुलींबाबत रुपाली चाकणकरांचं माैन का? रोहिणी खडसेंचा सवाल
मागील सुनावणीत तुषार मेहता हे ऑनलाईन हजर होते, मात्र आता ते उपस्थीत राहणार आहेत. यावेळी ते संपूर्ण वेळापत्रक वाचून दाखवतील. यानंतर कोर्टाच्या निर्णयानुसार वेळापत्रकात बदल करावा की नाही, याबाबत कोर्टाकडून जी माहीती येईल, हे आज पहावे लागेल. मागील सुनावणीत झालेल्या कोर्टाच्या कामकाजावेळी कोर्टाने विधानसभा अध्यक्षांचे कान धरले आहेत. यामुळे आज कोर्टात काय होईल हे पाहणे गरजेचे आहे.
शिवसेना आणि राष्ट्रवादी अपात्र आमदारांची सुनावणी
एकनाथ शिंदे यांच्या ४० आमदारांच्या बंडानंतर आता शिवसेना ठाकरे गटाने शिंदे गटाचे १६ आमदार अपात्र असल्याची याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. ही सुनावणी जून महिन्यापासून सुरू आहे. अशातच शिवसेनेसह आता राष्ट्रवादी शरद पवार गटाने देखिल सर्वोच्च न्यायालायात ९ आमदारांविरोधात याचिका दाखल केली आहे. ही य़ाचिका आता शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस अशी एकत्रिक याचिका होणार आहे.