31 C
Mumbai
Friday, March 29, 2024
HomeमुंबईSupreme Court : मुंबई महानगरपालिका निवडणुकांबाबत सुप्रीम कोर्टाने घेतला मोठा निर्णय

Supreme Court : मुंबई महानगरपालिका निवडणुकांबाबत सुप्रीम कोर्टाने घेतला मोठा निर्णय

महाविकास आघाडीला दिलासा देणारा निर्णय सुप्रीम कोर्टाकडून देण्यात आला आहे. सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयानुसार आगामी काळात मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका या महाविकास आघाडी सरकारमध्ये असताना घेतलेल्या वॉर्ड रचनेनुसारच घेण्यात येणार आहेत.

मुंबई महानगरपालिकेच्या वॉर्ड रचनांबाबत सुप्रीम कोर्टाकडून (Supreme Court) महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. महाविकास आघाडीचे राज्यात सरकार असताना त्यावेळी मुंबई महानगरपालिकेसाठी 236 वॉर्डची रचना तयार केली होती. परंतु राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार कोसळल्यानंतर नव्या भाजप-शिंदे सरकारने मात्र मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका या 2017 मधील वॉर्ड रचनेनुसार म्हणजेच 227 वॉर्ड रचनेप्रमाणेच निवडणुका होणार असे आदेश काढले. परंतु भाजप-शिंदे सरकारच्या या निर्णयाला महाविकास आघाडी आणि खास करून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून कोर्टात आव्हान देण्यात आले. याबाबतचा महाविकास आघाडीला दिलासा देणारा निर्णय सुप्रीम कोर्टाकडून देण्यात आला आहे. सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयानुसार आगामी काळात मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका या महाविकास आघाडी सरकारमध्ये असताना घेतलेल्या वॉर्ड रचनेनुसारच घेण्यात येणार आहेत.

दिल्लीमध्ये आज (ता. 22 ऑगस्ट) सुप्रीम कोर्टाकडून मुंबई महानगरपालिकेच्या वॉर्ड रचनेबाबत सुनावणी करण्यात आली. भाजप-शिंदे सरकारकडून मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका या 2017 च्या वॉर्ड रचनेनुसार होणार असा निर्णय घेण्यात आला होता. परंतु महाविकास आघाडी सरकार राज्यात असताना त्यावेळी या सरकारमध्ये एकनाथ शिंदे हे नगरविकास मंत्री होते आणि त्यांनीच मुंबई महानगरपालिकेच्या वॉर्ड रचनेत नऊ वॉर्ड वाढवून मुंबई महानगरपालिकेची वॉर्डची संख्या ही 227 वरून 236 केली होती.

पण त्यानंतर राज्यात भाजप-शिंदे सरकार येताच या सरकारने 236 वॉर्ड ऐवजी जुन्या वॉर्ड रचनेनुसार म्हणजेच 227 वॉर्ड नुसार निवडणुका घेण्यात येतील, असा निर्णय काढला. यावेळी देखील स्वतः एकनाथ शिंदे हेच नगरविकास खात्याचे मंत्री असून त्यांनी दीड ते दोन महिन्याच्या कालावधीत आपले निर्णय बदलले. त्यामुळे विरोधकांकडून त्यांच्यावर टीका करण्यात येत आहे. पण महाविकास आघाडीने आणि प्रामुख्याने शिवसेनेने स्वतःच्या फायद्यासाठी वॉर्ड रचनेत बदल करून मुंबई महानगरपालिकेच्या वॉर्डमध्ये नऊ वॉर्डची भर घातली, असे आरोप सुद्धा भाजपकडून करण्यात आले होते.

हे सुद्धा वाचा

तुकाराम मुंडेंना मुंबई मनपाच्या आयुक्तपदी घेण्याची मागणी

TET Scam : टीईटी घोटाळ्यातील अपात्र शिक्षकांचे पगार झाले बंद

VIDEO : नवी मुंबई महानगरपालिकेने वैतागून गाठली IIT मुंबई

दरम्यान, भाजप-शिंदे सरकारच्या या निर्णयाला शिवसेनेकडून सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आले. याबाबतचा निर्णय देत सुप्रीम कोर्टाने मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका या ‘जैसे थे’ ठेवा, असे आदेश दिले आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीला याचा मोठा दिलासा मिळाला आहे, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. परंतु अद्यापही भाजप-शिंदे सरकारकडून यांवर कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

स्वतः आधी नगरविकास मंत्री असताना वॉर्ड रचनेत बदल करण्याच्या अध्यादेशावर एकनाथ शिंदे यांच्याकडून सही करण्यात आली होती. पण आता भाजप-शिंदे सरकारमध्ये जाताच कोणता साक्षात्कार झाला आणि त्यांनी त्यांचेच घेतलेले निर्णय बदलले, असा टोला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी व्यक्त केले आहे. तसेच न्यायदेवतेने आम्हाला न्याय दिला आहे, असे सुद्धा अंबादास दानवे म्हणाले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी