28 C
Mumbai
Sunday, September 4, 2022
घरमुंबईSushma Andhare : शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे म्हणतात राज साहेब म्हणजे कोण?

Sushma Andhare : शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे म्हणतात राज साहेब म्हणजे कोण?

जळगाव जिल्ह्यातील पाचोरा शहराच्या नगरपरिषद हद्दीतील शहर विकास आराखड्यातील कोरोना काळात बेकायदेशीर कारवाया करण्यात आल्या. नगरविकास आराखड्याचे नियम धाब्यावर बसवून सोयीप्रमाणे बदल घडवून आणत सरकारी जमिनींचे आरक्षणच काढून टाकले आहे. हाच मुद्दा उपस्थित करण्यासाठी शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी आज पत्रकार परिषद आयोजित केली होती

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शस्त्रक्रियेनंतर आज (दि. 23 ऑगस्ट) पहिल्यांदा मनसैनिकांशी जाहीरपणे संवाद साधला. प्रभादेवी येथील रविंद्र नाट्यमंदिरात आयोजित सभेत केलेले भाषण सुद्धा नेहमीप्रमाणे दमदार ठरले. आपल्या ठाकरी शैलीत शब्दांची फटकेबाजी करीत राज्यात बेभान चालणाऱ्या सत्ताकारणावर त्यांनी भाष्य केले. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर सुद्धा टीका करत जोरदार हल्लाबोल केला. दरम्यान हाच मुद्दा उपस्थित करत पत्रकारांनी शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांना प्रश्न विचारला, त्यावर राज साहेब म्हणजे कोण असे म्हणून त्यांनी प्रतिप्रश्न केला. कधीकाळी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांना न ओळखणाऱ्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) आता राज ठाकरे यांना ओळखत नाही का असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे.

जळगाव जिल्ह्यातील पाचोरा शहराच्या नगरपरिषद हद्दीतील शहर विकास आराखड्यातील कोरोना काळात बेकायदेशीर कारवाया करण्यात आल्या. नगरविकास आराखड्याचे नियम धाब्यावर बसवून सोयीप्रमाणे बदल घडवून आणत सरकारी जमिनींचे आरक्षणच काढून टाकले आहे त्यामुळे त्या जमिनीवर वयक्तिक बांधकाम होण्याचा धोका वाढला आहे. हाच मुद्दा उपस्थित करत त्यावर न्याय मिळण्याच्या मागणीसाठी शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी आज पत्रकार परिषद आयोजित केली होती, त्यावेळी अंधारे यांनी जळगावच्या या प्रश्नासह इतर अनेक प्रश्नांवर माध्यमांशी संवाद साधला.

हे सुद्धा वाचा…

Ambadas Danve : सरकारने अंबादास दानवे यांच्या मागण्या पूर्ण करण्याचे दिले आश्वासन

‘Nayyara Noor : भारतात जन्मलेली पाकिस्तानची बुलबुल ‘नय्यारा नूर’ यांचा आवाज हरपला

Ex MLA Ashok Patil : शिवसेनेचे माजी आमदार अशोक पाटील यांचा शिंदे गटात प्रवेश

सुषमा अंधारे यांचे बोलून संपताच पत्रकार प्रश्न विचारू लागले तेव्हा एका पत्रकाराने राज ठाकरे यांच्या आजच्या सभेत उद्धव ठाकरेंवर केलेल्या टीकेवर अंधारे यांचे मत विचारले असता, त्यावर राज साहेब म्हणजे कोण असा प्रतिप्रश्नच त्यांनी केला आणि त्यानंतर आपले मत मांडले. कधीकाळी शिवसेनेच्या विरोधात बोलणाऱ्या सुषमा अंधारे यांनी अखेर शिवसेनेची वाट धरली असून त्या शिवसेनेचे गुणगाण करू लागल्या आहेत. त्यांच्या या बदलणाऱ्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी