34 C
Mumbai
Saturday, April 20, 2024
Homeमुंबईभारतात 'नैरोबी फ्लाय' माशीची दहशत

भारतात ‘नैरोबी फ्लाय’ माशीची दहशत

टीम लय भारी

मुंबई : एका छोट्या माशीने सध्या भारतातल्या काही राज्यात थैमान घातले आहे. ‘नैरोबी फ्लाय’ असे या माशीचे नाव असून या माशीपासून लांब राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. या माशीमुळे डोळ्यांच्या दृष्टीवर परिणाम होऊ शकतो, असेही सांगण्यात येत आहे. नैरोबी फ्लाय नावाची ही माशी दिसायला लहान असली तरी तिच्या चावण्याने शरीरावर गंभीर परिणाम होऊ शकतात.

नैरोबी फ्लाय ही माशी डोळ्यावर बसली तर तिच्या चावण्याने डोळ्याची दृष्टी देखील कमी होऊ शकते. इतकेच नाही तर ही माशी अंगावर बसली किंवा चावली तर शरीराच्या त्या भागावर गंभीर दुखापत देखील होऊ शकते. त्यामुळे या माशीपासून सावध राहा असेही सांगण्यात आले आहे.

ही माशी चावल्यानंतर किंवा शरीराच्या कोणत्याही भागावर बसल्यानंतर शरीराचा तो भाग लालसर होण्यास सुरूवात होऊन जळजळ व्हायला लागते. त्यामुळे, ही मध शरीरावर बसल्यास तिला हळुवार काढून टाकावे, पण त्या माशीला मारून टाकू नये. या माशीला मारल्यास त्याचा गंभीर परिणाम होऊ शकतो, असेही तज्ज्ञांकडून सांगण्यात आले आहे. या माशीपासून संरक्षण करण्यासाठी घर आणि आपला परिसर स्वच्छ ठेवण्यात यावा.

ही माशी चावल्यामुळे बिहारमधील अनेक लोकांवर उपचार करण्यात येत आहेत. त्यामुळे बिहारमधील लोकांमध्ये या माशीची दहशत निर्माण झाली आहे. या मशीन अद्याप महारष्ट्रात शिरकाव केलेला नाही. त्यामुळे सध्यातरी महाराष्ट्र या माशीपासून सुरक्षित आहे. दरम्यान, पश्चिम बंगालच्या मार्गे ही माशी किशनगंज जिल्ह्यातील काही भागात दाखल झाल्याचे सांगण्यात येत आहे.

हे सुद्धा वाचा :

नगर परिषद निवडणुकीबाबत ओबीसी उमेदवारांना मिळाला दिलासा

‘सिंग, डान्स अॅंड प्रे’ चरित्रात्मक ग्रंथाचे राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते प्रकाशन

नेमका कधी जाहीर होणार CBSE बोर्डाचा निकाल ?

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी