28 C
Mumbai
Wednesday, April 24, 2024
Homeमुंबईठाकरेंच्या बिल्डरधार्जिण्या धोरणामुळे गुदमरली मुंबई; आशिष शेलार यांचा गंभीर आरोप

ठाकरेंच्या बिल्डरधार्जिण्या धोरणामुळे गुदमरली मुंबई; आशिष शेलार यांचा गंभीर आरोप

मागील काही दिवसांत मुंबईतील प्रदूषणाच्या (Air Pollution) पातळीत दिल्लीपेक्षाही वाढ झाली होती. याला उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील तत्कालीन महाविकास आघाडी सरकार जबाबदार आहे, असा गंभीर आरोप भारतीय जनता पक्षाचे नेते, मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी केला आहे. याप्रकरणी दिल्लीच्या धर्तीवर ‘हवा गुणवत्ता व्यवस्थापन अयोग’ स्थापन करण्यात यावा, अशी मागणी शेलार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. (Thackeray Government responsible for Mumbai air pollution Ashish Shelar crticize MVA) मुंबईत एकाच वेळी सुरु करण्यात आलेल्या नियोजनशून्य विकासकामांमुळे मुंबईतील हवेतील प्रदूषणात वाढ झाल्याची टीका शेलार यांनी केली आहे.

यंदाच्या हिवाळ्यात मुंबईतील प्रदूषणात अचानक झालेली वाढ ही नियोजनशून्य बांधकामांमुळे झाली आहे. मुंबईतील ५० टक्के प्रदूषण हे याच बांधकामांमुळे झाले आहे, असे आशिष शेलार म्हणाले. मात्र, मुंबईतील या वातावरणीय बदलांचे वैज्ञानिक पृथक्करण करण्यात येत नाही. महापालिकेच्या शहर नियोजन आणि आपत्कालीन विभागाकडे प्रदूषणाच्या पातळीच्या नोंदीदेखील ठेवण्यात येत नाहीत, असे सांगत शेलार यांनी मुंबई महानगरपालिकेच्या गलथान कारभारावर टीका केली. ते म्हणाले, “मुंबईत १५०० पेक्षा अधिक पुनर्विकास प्रकल्पांचे काम सुरु आहे. कोणतेही नियोजन न करता महापालिकेमार्फत या बांधकामांना परवानगी देण्यात आली. त्यामुळे दिल्लीच्या धर्तीवर मुंबईतदेखील ‘हवा गुणवत्ता व्यवस्थापन अयोग’ स्थापन करावा.”

हे सुद्धा वाचा

Ashish Shelar : करोना काळात पालिकेत भ्रष्टाचार?; भाजपचा महापौरांवर गंभीर आरोप : आशिष शेलार

Ashish Shelar : ‘विकास योजनांबाबत का शत्रूसारखे वागताय ?’, भाजपा नेते आशिष शेलार यांचा CM ठाकरे यांना सवाल

Ashish Shelar : अशिष शेलार म्हणाले, तो राजहंस एक…….

या पत्रात आशिष शेलार यांनी ‘एमएमआर’ प्रदेश आणि मुंबईच्या हद्दीतील बेकऱ्या आणि भोजनालयांसाठी वापरण्यात येणारा कोळसा आणि लाकडावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. त्यांना CNG किंवा PNG वापरण्यासाठी प्रोत्साहित केले पाहिजे. त्यासाठी मुंबई महापालिकेने त्यांना कमी व्याज दरावर १०० कोटी रुपये कर्ज स्वरुपात उपलब्ध करुन देण्यात यावेत, असे शेलार यांनी म्हंटल आहे.

माहुल बनले विषारी वायूचे चेंबर

‘एजिस लॉजिस्टिक लिमिटेड’ आणि ‘सी लॉर्ड कंटेनर्स लिमिटेड’ या प्रदूषणकारी उद्योगांना माहुलमधून स्थलांतरित करणे आवश्यक आहे, या उद्योगांनी माहुलला विषारी वायूचे चेंबरच बनवले आहे. याप्रकरणी न्यायालयाने ताशेरे ओढले असून राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने ही या कंपन्यांना मोठा दंड ठोठावला आहे. न्यायालयाच्या निर्बंधानंतरही मविआ सरकारने आणि तत्कालीन पर्यावरण मंत्र्यांनी याबाबत कोणत्याच उपाययोजना केल्या नाहीत. ही अत्यंत शरमेची बाब असल्याचे सांगत त्यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.

बेहरामपाडा परिसरात बेकायदेशीर भट्ट्या
मुंबईतील मालवणी, जोगेश्वरी आणि बेहरामपाडा भागात मोठया प्रमाणात सुका कचरा जाळण्यात येतो या कच-यातून धातू काढण्यासाठी बेकायदेशीर भट्ट्या चालवल्या जातात. या भट्ट्यांमधून निघणारा धूर सतत वातावरणात मिसळत राहतो. त्यामुळे त्यावर निर्बंध आणणे आवश्यक असल्याचे शेलार यांनी म्हंटले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी