24 C
Mumbai
Thursday, November 30, 2023
घरमुंबईठाणे बंदला संमिश्र प्रतिसाद, राजकीय पक्षांचा बंदला पाठिंबा

ठाणे बंदला संमिश्र प्रतिसाद, राजकीय पक्षांचा बंदला पाठिंबा

सकल मराठा समाजाने सोमवारी पुकारलेल्या ठाणे बंदला संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. रिक्षा, बससेवा सुरळीत सुरू आहे. एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेला या बंदला पाठिंबा नाही. मात्र मनसेसह सगळेच पक्ष या बंदमध्ये सहभागी झाले आहेत. शहरातील मुख्य बाजार पेठेतील काही दुकाने बंद आहेत. बाकी जनजीवन सुरळीत सुरू आहे.

राज्यात मराठा आरक्षण आंदोलन पेट घेऊ लागले आहे. जालना येथे मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला राज्यातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळेच की काय मराठा आरक्षण तातडीने मिळावे या मागणीसाठी ठाणे बंद करण्याची हाक सकल मराठा समाजाने दिल्यावर दोन्ही काँग्रेस, मनसे आणि अन्य पक्षांनी या बंदला पाठिंबा दिला आहे. पण एकनाथ शिंदे गटाची शिवसेना यात सहभागी नाही.

हे ही वाचा 

भाजपा सरकारबरोबर जाण्याचे अजित पवार यांनी सांगितले खरे कारण…. काय म्हणाले उपमुख्यमंत्री?

ठाण्यात लिफ्ट कोसळून 6 कामगारांचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी

भाजपचा आमदार उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून एकनाथ शिंदेंच्या मुलाला देणार टक्कर ?

सकाळी ठाण्यात या बंदला सुरुवात झाली. मुख्य बाजारपेठेतील अनेक दुकाने बंद होती. मात्र रिक्षा आणि बसेस सुरू असल्याने कामावर जाणाऱ्यांचे हाल झाले नाही. दुपारपर्यंत बंद शांततेत सुरू होता. दरम्यान ठाण्यात एक पदयात्रा काढण्यात आली. त्यात मनसेचे पदाधिकारी सहभागी झाले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी