30 C
Mumbai
Tuesday, August 2, 2022
घरमुंबईबाळासाहेब ठाकरे असते तर, राज्यपालांना धुतलं असतं

बाळासाहेब ठाकरे असते तर, राज्यपालांना धुतलं असतं

टीम लय भारी

मुंबईः गुजराती आणि राजस्थानी निघून गेले. तर मुंबईत पैसाच उरणार नाही आणि मुंबई आर्थिक राजधानी राहणार नाही असे वक्तव्य भगसिंह कोश्यारींनी केले आहे. काल मुंबईतील अंधेरी पश्चिम भागात स्थानिक चौकाला दिवंगत श्रीमती शांतीदेवी चंपालालजी कोठारी यांचे नाव देण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. राज्यपालांचे हे वक्तव्य म्हणजे महाराष्ट्राचा अपमान आहे. यावर संपूर्ण राज्यातून निषेध व्यक्त केला जात आहे. या पूर्वी राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त विधान केले होते. सोशल मीडियावर  भगतसिंह कोश्यारींचा खरपूस समार घेतला जात आहे.

राज्यपाल हे संविधानिक पद आहे. मात्र राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे त्याला अपवाद आहेत. आपल्या राज्याचे राज्यपाल हे हिमाचल प्रदेशमधून आले आहेत. त्यांना महाराष्ट्राचा कोणत्याही प्रकारचा अभ्यास नाही. ते भाजपचे प्रवक्ते असल्याचे अनेकदा आपल्या वक्तव्यातून स्पष्ट केले आहेे. आता तर त्यांनी मराठी माणसाच्या अस्मितेलाच धक्का पोहोचवला आहे. मात्र आशा वेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुग गिळून गप्प आहेत. आज बाळासाहेब ठाकरे असे तर राज्यपालांना आणि त्यांच्या समर्थकांना ’सळो की पळो’ करुन सोडलं असतं. बाळासाहेब  यांनी राज्यपालांना धू धू धूतलं असतं हे मात्र खरं.

यापूर्वी देखील मुंबई गुजरातला नेण्याचा घाट घातला होता. त्यावेळी बाळासाहेब ठाकरेनी उठाव केला होता. आज सीमेवर देशाचे रक्षण करण्यात  मराठी माणसांची टक्केवारी जास्त आहे. मराठी माणूस मुर्ख नाही. मराठी माणूस प्रेमळ असून, तो सर्वांवर दया करतो, म्हणून या लोकांना मराठी माणसांच्या जमिनींवर कब्जा केला. त्यांना नोकर बनवण्याचा प्रयत्न केला. मुंबई आणि ठाणे ही कोळी आणि आगरी लोकांची जन्म आणि कर्मभूमी आहे. त्यांचा मासेमारीचा, मीठागरांचा तसेच शेती, बागायतींचा व्यवसाय आहे. इथला मराठी माणूस भिकारी तर नक्कीच नाही. त्याची मानसिक श्रीमंती वाखाणण्या जोगी आहे. राज्याच्याच नव्हे तर देशाच्या अनेक भागांतून लोक इथे कमावण्यासाठी येत असतात.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी यासंदर्भात एक ट्वीट केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्रात भाजपा पुरस्कृत मुख्यमंत्री होताच मराठी माणूस आणि शिवरायांचा अपमान सुरू झाला. बाहेर पडलेला गट हे ऐकूनही गप्प बसणार असेल, तर शिवसेनेचे नाव घेऊ नका.काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी म्हटलं आहे की, राज्याचा राज्यपाल त्याच राज्याच्या जनतेची बदनामी करतो हे भयंकर आहे. गुजराती राजस्थानी हा विषय राहू द्या यांनाच सर्वात आधी नारळ दिला पाहिजे. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्र आणि मुंबईतील माणूस कर्तबगार आणि सक्षम आहे. मराठी माणसाच्या जीवावर अनेक राज्य पोसल्या जातात. आम्ही चटणी भाकर खाऊन पोट भरून इतरांना पोसणारी इमानदार माणसे आहोत. आपण मराठी माणसाचा अपमान केलाय महाराष्ट्राची लवकरात लवकर माफी मागा.

राज्यपालांच्या वक्तव्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील राज्यपालांना आपल्या शैलीत खडसावले आहे. मराठी माणसाला डिवचू नका! आपल्याला महाराष्ट्राच्या इतिहासाबद्दल माहिती नसेल तर बोलत जाऊ नका, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे. राज्यपालांनी नको त्या गोष्टीत नाक खुपसू नये.मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी पत्रकार परिषदेत म्हटले की, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यपाल म्हणून असलेली जबाबदारी कधीच पार पाडली नाही. राज्यपाल हे केवळ वादग्रस्त राज्यपाल म्हणूनच प्रसिद्ध आहेत. त्यांना कशीही प्रसिद्धी हवी असते. नकारात्मक प्रसिद्धी असली तरी चालते. राज्यपाल पदाचा मान सन्मान आम्ही ठेवतो. या पदाचा मान राखून सांगते की, यापुढे राज्यपालांनी महाराष्ट्राचा अपमान करण्याची हिंमत करू नये, असा इशारा त्यांनी दिला. महाराष्ट्रातील मराठी माणसांचे योगदान कसे विसरता येईल, महाराष्ट्रात राहुनच मराठी लोकांचा विसर कसा पडतो असा सवालही पेडणेकर यांनी केला.

हे सुध्दा वाचाः

VIDEO : ‘टॅक्सी’वाले जाणार संपावर!

जयंत पाटलांनी राज्यपालांना दुसऱ्या राज्यात जाऊन राहण्याचा दिला सल्ला

शिवसेनेची गळती थांबेना, शिंदे गटात अर्जुन खोतकर सामील होणार?

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!