28 C
Mumbai
Thursday, March 28, 2024
HomeमुंबईHigher Education : 'उच्च शिक्षणाची वाटचाल भांडवलशाहीकडे'

Higher Education : ‘उच्च शिक्षणाची वाटचाल भांडवलशाहीकडे’

आपल्याकडे 5 सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून मोठया उत्साहात साजरा केला जातो. राज्यातील विविध शाळा महाविद्यालयांमध्ये हा दिवस मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. सत्याग्रह अध्यापक महाविद्यालयात शिक्षक दिन मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.

आपल्याकडे 5 सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून मोठया उत्साहात साजरा केला जातो. राज्यातील विविध शाळा महाविद्यालयांमध्ये हा दिवस मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. सत्याग्रह अध्यापक महाविद्यालयात शिक्षक दिन मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. शिक्षक दिनाच्या निमित्ताने राहूल शिक्षण प्रसारक मंडळातील डॉ. जी. के. डोंगरगावकर इंटरनॅशनल स्कूल, अजिंठा इंटरनॅशनल स्कूल, सिद्धार्थ मल्टिपरपज रेसिडेनशल हायस्कूल, सत्याग्रह महाविद्यालयात शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. यावेळी पाली भाषेचे साहित्यीक भदंन्त डॉ. ज्ञानदीप महाथेरो यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या वेळी सुजाता भोसले, अमरचंद हाडोळतीकर, प्रा. प्रज्ञा खोपकर यांनी डीजिटल युगातील शिक्षक आणि त्यांची संविधानिक जबाबदारी यावर मार्मिक विचार मांडले.

जगातील स्पर्धेमध्ये आजचा विद्यार्थी उतरला पाहिजे. यशस्वी झाला पाहिजे. यासाठी एका बाजूला शिक्षणाचे भांडवलीकरण होत असून, समाजातील गरीब जिवन जगत असलेल्या विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळायला हवे. श‍िक्षणाचे भांडवलीकरण होत असून, अधुनिक सुविधा उपलब्ध नसलेल्या शाळेमध्ये शिक्षण घेणे अवघड झाले आहे. शासनाने किमान शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास याकडे लक्ष केंद्र‍ित करणे गरजेचे आहे. खासगी उद्योजकावर उच्च शिक्षणाची जबाबदारी भविष्यात राष्ट्राला अडचणीत टाकणारी आहे. सरकारने उच्च शिक्षणाचे दरवाजे खाजगी उद्योजकासाठी खुले केले आहेत. मात्र सर्व संवर्गातील आर्थिक चणचणीमुळे शिक्षण घेणे अवघड झाले आहे.

हे सुद्धा वाचा

Ambadas Danve : ‘शिंदे सरकारची पकड ढिली, प्रशासनाचा शेतकऱ्यांवर अन्याय’

Dhananjay Munde : धनंजय मुंडे धावले अडचणीत आलेल्यांच्या मदतीसाठी

Governor : ‘ठाकरे सरकारची 12 आमदारांची यादी रद्द करणे ही संवैधानिक चूक’

शिक्षणाची वाटचाल भांडवलशाही मार्गाने सुरू आहे. ही वाटचाल असंवैधानिक असल्याचे प्रा.नेहा राणे म्हणाल्या. गौरी गणपतीची शाळांना सुटटी असून, देखील हा दिवस साजरा केला. यावेळी थोर समाज सुधारकांच्या विचारांचा गौरव करण्यात आला. उपस्थ‍ितांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. राष्ट्रगिताने या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी