32 C
Mumbai
Friday, April 19, 2024
Homeमुंबईअतिधोकादायक इमारतींचा प्रश्न कायमच; नागरिकांचा जीव अजूनही टांगणीला

अतिधोकादायक इमारतींचा प्रश्न कायमच; नागरिकांचा जीव अजूनही टांगणीला

टीम लय भारी 

ठाणे : मुंबईत दरवर्षी धोकादायक, अतिधोकादायक इमारती कोसळून जीवीतहानी, वित्तहानी होण्याचा धोका ठाण मांडून बसलेला असतो, परंतु प्रशासन मात्र ठिम्मपणे कारभार करण्यावर समाधान मानत असल्याचे दरवेळी दिसून येते. ठाणे महापालिका क्षेत्रातील धोकादायक इमारतींची यादी जाहीर करण्यात आली होती. त्यातील 74 इमारतींचे अतिधोकादायक यादीत नाव आले होते, परंतु केवळ 29 इमारतीच अद्याप रिकाम्या करण्यात आल्याचे धक्कादायक वृत्त समोर आले आहे, त्यामुळे इतर इमारतींकडे कधी लक्ष देणार असा प्रश्न विचारण्यात येत आहे.

ठाणे महानगरपालिकेकडून धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतींची यादी जाहीर करून शासनाने या इमारतीतील रहिवाश्यांना इतर ठिकाणी स्थलांतरीत होण्याची नोटीस बजावून अतिधोकादायक इमारती पाडण्याचे काम हाती घेतले होते. प्रत्यक्षात 74 इमारती अतिधोकादायक असताना सुद्धा केवळ 29 इमारतीच रिकाम्या करण्यात आल्या त्यामुळे प्रशासनाच्या कारभारावर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

उर्वरित इमारतींमध्ये आजसुद्धा नागरिक मोठ्या कष्टाने जीव मुठीत घेऊन राहत आहेत. मालकासोबत असलेला जागेचा वाद तसेच इतर विविध कारणांमुळे हे नागरिक घरे रिकामी करण्यास तयार होत असल्याचे पालिका सुत्रांकडून यावेळी सांगण्यात आले आहे.

ठाणे, वागळे इस्टेट, कळवा आणि मुंब्रा या भागात मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर इमारती आहेत, तसेच नौपाडा परिसरातील जुन्या अधिकृत इमारतींनी सुद्धा मान टाकली आहे. त्यामुळे प्रशासनाने तात्काळ यावर पावलं उचलून दरवर्षीचा जीवघेणा रीवाज मोडीत काढावा आणि नागरिकांना तात्काळ दिलासा द्यावा अशा भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहेत.

हे सुद्धा वाचा…

काय सांगता…? 74 वर्षीय तरुणाचा चक्क मोटारसायकलवरून सांगली ते अमरनाथ प्रवास

अंबरनाथ नगर परिषदेतही उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला बसणार धक्का

शिंदे गटातील आमदार म्हणतात ‘मंत्री पद कोणाला नकोय?’

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी