29 C
Mumbai
Monday, August 15, 2022
घरमुंबईशिवसेनेतील बंडखोरांनी ‘पक्षघटनेला‘च फासला हरताळ

शिवसेनेतील बंडखोरांनी ‘पक्षघटनेला‘च फासला हरताळ

टीम लय भारी

मुंबई: शिवसेनेतून बंडखोरी केलेल्या सर्वच आमदारांनी आपल्या बंडाला उध्दव ठाकरेंना जबाबदार धरले. तसेच शरद पवार आणि अजित पवारांवर त्यांचा राग आहे. अनेक आमदारांनी आपला वारंवार आपमान झाल्याचे सांगितले. पक्षप्रमुख आपल्याला वेळ देत नसल्याचे देखील सांगितले. आता  शिंदेगटाने नवीन कार्यकारणी, उपनेते, मुख्य नेतापद, प्रतोत, विधानसभा अध्यक्ष यांची निवड केली. हे सर्व करत असतांना त्यांनी शिवसेना पक्षाच्या मूळ घटनेलाच हरताळ फासला आहे.

शिवसेनेच्या मुळ घटनेमध्ये पक्षप्रमुख राष्ट्रीय कार्यकारणी, उपनेता, राज्यसंपर्क प्रमुखांची नियुक्ती शिवसेना पक्षप्रमुख करतील असा उल्लेख आहे. एखादया सदस्याची पक्षातून हाकलपट्टी केल्यानंतर त्या सदस्याला पुन्हा पक्षात प्रवेश देता येईल. मात्र पुन्हा प्रवेश दिल्यानंतर पुढील पाच वर्ष त्याला पक्षात कोणतेही पद मिळणार नाही. पक्षाचा कोणताही पदाधिकारी ‘शिसेनाप्रमुख‘ हे पद घेवू शकत नाही. ते पद केवळ स्व.बाळा साहेब ठाकरे यांच्याकडेच राहिल. तसेच पक्षाच्या घटनेत दुरुस्ती करण्याचा अधिकार केवळ पक्षाच्या प्रतिनिधी सभेला आहे. मात्र अंतिम निर्णय हा पक्षप्रमुखच घेतील आणि पक्ष प्रमुखांचा निर्णय हा अंतिम निर्णय असेल.

राष्ट्रीय कार्यकारिणीची निवडणूक ही 13 सदस्यांची असेल आणि दर पाच वर्षांनी पक्षप्रमुखांच्या अध्यक्षतेखाली याची निवड होईल. पक्षप्रमुखांची इच्छा असल्यास ते शिवसेना उपनेत्यांची नेमणूक करु शकतात. एकूण 33 उपनेते असतील. ते पक्षप्रमुखांचा आदेश पाळतील. कामगार आघाडी व इतर संघटना तयार करण्याचा अधिकार पक्षप्रमुखांना असेल. आशा प्रकारे पक्षप्रमुखांकडे सर्व अधिकार आहेत. 5 वर्षे ते या पदावर राहतील. पक्षाचे प्रशासन व धोरण ठरविण्याचा अधिकार पक्षप्रमुखांना आहे. ते कोणाली पदावरुन हटवू शकतात. पक्षाचा सदस्य अथवा पदाधिकारी हाटविण्याचा अधिकार पक्षप्रमुखांना आहे.

आशा प्रकारे शिवसनेची असलेली घटना शिवसेनेतील बंडखोर नेते एकनाथ शिंदे आणि इतर आमदारांना महिती नाही का? असा प्रश्न निर्माण झाल्या शिवाय राहत नाही. ज्यांनी आपला उभा जन्मच केवळ शिवसेनेसाठी खर्ची केला, असे आमदार या शिंदे गटात सामील झाले असून, त्यांनी या घटनेची पायमल्ली का केली असावी? आता शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे समोर जो पेचप्रसंग निर्माण झाला आहे. त्यातून ही शिवसेनेची पक्षघटना त्यांना सहिसलामत सोडवू शकते अशी आशेची पालवी शिवसैनिकांच्या मनात आहे-

शिवसेनेचे चिन्ह वाघ असून, निवडणूक चिन्ह हे धनुष्यबाण आहे. याच धनुष्यबाण चिन्हावर शिंदे गट दावा करण्याची शक्यता आहे. शिवसेनेच्या घटनेचा भंग केल्याची कारवाई होवू नये म्हणूनच एकनाथ शिंदे आणि शिंदेगटाचे आमदार आम्ही शिवसेनेतच आहोत असे वारंवार सांगत आहेत. या दाव्यांमुळे नेमकी शिवसेना कोणाची, हा पेचप्रसंग निर्माण झाला आहे. हे एक भाजपने आखलेले चक्रव्युह आहे. या चक्रव्युहात उध्दव ठाकरेंना अडकवू पाहणारे एकनाथ शिंदे सुध्दा स्वतः अडकले आहेत. या पेचप्रसंगाचा निर्णय होण्यासाठी ऑगस्ट महिन्याची वाट पाहावी लागणार आहे.

हे सुध्दा वाचा:

सत्ता संघर्षाच्या तिढयाला ‘राज्यपाल’ जबाबदार ?

चित्रा वाघ यांची आक्रमक भूमिका नव्या सरकार समोर गायब

जनरल नाॅलेज: राष्ट्रपतींना ‘शपथ‘ कोण देतो?

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी