38 C
Mumbai
Tuesday, April 16, 2024
Homeमुंबई५० हजार सैनिकांना यमसदनी पाठवणारी विषकन्या : माता हारी

५० हजार सैनिकांना यमसदनी पाठवणारी विषकन्या : माता हारी

आपल्या कमनीय देहावरील कपड्यांचे बंधन झुगारून देत ती ललना जेव्हा मादक नृत्य करू लागायची तेव्हा उपस्थित लब्धप्रतिष्ठित, सैन्य अधिकारी तिच्या अदांनी घायाळ व्हायचे... परदेशातील स्ट्रीप डान्सची सुरुवातच या मोहक आणि अतिशय सुंदर नृत्यांगनेने केली असे म्हंटले तर वावगे ठरणार नाही... तिच्या पदलालित्याने उपस्थितांच्या हृदयाचा ठोका चुकायचा... कोण होती ही ललना? तब्बल ५० हजार सैनिकांना यमसदनी पोहोचवणारी विषकन्या... माता हारी..!

जर्मनीच्या राजपुत्रालाही पडली भुरळ

Seductresses: Mata Hari — KLEAN Magazine
जर्मनीच्या राजपुत्रालाही भुरळ पडणारी ललना

१८७६ मध्ये नेदरलँडमध्ये माता हारीचा जन्म झाला. त्यानंतर तिचे कुटुंब फ्रांसमध्ये स्थायिक झाले. ती कुटुंबासमवेत फ्रान्समध्येच राहू लागली. असे म्हणतात की जर्मनीचा राजपुत्रही तिचा चाहता बनला होता. फ्रांस, नेदरलँड, जर्मनी (France, Netherland, Germany) या देशांमध्ये तिच्या सौंदर्याची आणि मादक नृत्याची भुरळ पडली होती. तिचे खरे नाव मार्गेथा गिर्त्रुडा त्सेला असे होते. इंडोनेशियात तैनात असलेल्या एका डच सैन्याधिकाऱ्याशी तिने लग्न केले. इंडोनेशियात तिने आपले नाव बदलून ती स्वतःला माता हारी असे म्हणवून घेऊ लागली. इंडोनेशियात (Indonesia) माता हारीचा अर्थ सूर्य असा होतो. काही वर्षे इंडोनेशियात संसार केल्यानंतर तिने घटस्फोट घेतला आणि नंतर ती पुन्हा फ्रान्सला परत आली.

फ्रान्ससाठी हेरगिरी करू लागली

The Spy Dancer? Exploring Mata Hari | Newsmobile
फ्रान्सची विषकन्या

माता हारीच्या चाहत्यांची संख्या दिवसेंदिवस वाढूच लागली होती. माता हारीच्या प्रसिद्धीने आता कळस गाठला होता. तिच्या नृत्याची लोकांना धुंदी चढू लागली होती. नामांकित आणि प्रसिद्ध व्यक्तींशी तिची जवळीक वाढू लागली होती. फ्रान्सला ही गोष्ट ठाऊक होती आणि त्यासाठीच फ्रान्सने तिचा वापर करण्याचे ठरवले. त्यावेळी पहिल्या महायुद्धाचे वारे वाहू लागले होते. आणि याच काळात माता हारीच्या हेरगिरीचा प्रवास सुरु झाला. पहिल्या विश्वयुद्धात हेरगिरी करण्यासाठी फ्रान्सने तिला मोठी रक्कम अदा केली. जर्मन सैन्याधिकाऱ्यांना आपल्या मोहपाशात अडकवायची कामगिरी तिच्यावर सोपविण्यात आली. जर्मन सैन्याला आपल्या जाळ्यात अडकवणे तिच्यासाठी कठीण काम नव्हते.

५० हजार सैनिकांना मारणारी विषकन्या

Mata Hari - IMDbजर्मनीत हेरगिरी करण्यासाठी गेलेल्या माता हारीने फ्रान्सशीच दगाबाजी केली. पैशाच्या लालसेने ती ‘डबल एजंट’ म्हणून काम करू लागली. म्हणजे फ्रान्सची गुपिते जर्मनीच्या सैन्य अधिकाऱ्यांसमोर उघड करू लागली होती. फ्रान्सला या विषकन्येच्या कारस्थानांचा पत्ता लागला होता. पण तोपर्यंत फ्रान्सचे ५० हजार सैनिक यमसदनी पोहोचले होते. १९१७ मध्ये फ्रान्सने माता हारीला जेरबंद केले.

माता हारीचा करुण अंत

10 facts about Mata Hari, the 'greatest woman spy of the century' - India Today

फ्रान्सच्या ५० हजार सैनिकांच्या मृत्यूसाठी माता हारीला जबाबदार ठरविण्यात आले. पण तिच्यावरील हा आरोप सिद्ध झाला नव्हता. असेही म्हणले जाते की, महायुद्धात फ्रान्सचा जो पराभव झाला त्याचे खापर कोणावर तरी फोडण्यासाठी तिला बळी देण्यात आले. फ्रान्सच्या सैनिकांचा जो नरसंहार झाला होता त्यामुळे फ्रान्सची नाचक्की झाली होती. यासाठी माता हारीला ‘बळीचा बकरा’ (Scapegoat) बनविण्यात आले. १५ ऑक्टोबर, १९१७ रोजी न्यायालायने तिला दोषी ठरवत गोळ्या घालण्याचे आदेश दिले. (Execution of Mata Hari) माता हारीला एका निर्जन ठिकाणी नेण्यात आले. तिचे हाथ बांधून तिच्यावर अंदाधुंद गोळ्या झाडण्यात आल्या.

मृत्यूनंतरही फ्रान्स माता हारीच्या प्रेमात

Mata Hari – die Frau die lieben wollte | Xtranews / Die andere Zeitung

माता हारीच्या मृत्यूनंतर तिचे शव स्वीकारण्यास तिच्या कुटुंबीयांपैकी कोणीही पुढे आले नाही. तिच्या मृत्यूनंतरही तिच्या सौंदर्याची मोहिनी फ्रान्सवर कायम होती. त्यामुळेच तिच्या चेहऱ्याचे एका प्रयोगशाळेत जतन करण्यात आले. पण काही वर्षांनी तिचा तो चेहरा अज्ञात व्यक्तीने चोरून नेला. एका लावण्यवतीचा अशा प्रकारे करुण अंत झाला…

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी