29 C
Mumbai
Tuesday, August 8, 2023
घरमुंबईकोंकणीबहुल दिव्यात कोंकणाकडे जाणाऱ्या गाड्यांना थांबाच नाही; प्रवाशांमध्ये नाराजी

कोंकणीबहुल दिव्यात कोंकणाकडे जाणाऱ्या गाड्यांना थांबाच नाही; प्रवाशांमध्ये नाराजी

मध्य रेल्वेच्या अनेक जंक्शनपैकी एक असलेल्या, ठाणे महापालिकेच्या हद्दीत येणाऱ्या दिवा परिसरात मोठ्या संख्येने कोंकणी माणूस राहत आहे. गणेशोत्सव अवघ्या दोन महिन्यावर येऊन ठेपला आहे. सणासाठी गावी जाणाऱ्या लोकांनी आतापासूनच रेल्वे गाड्यांचे बुकिंग केले आहे. पण दरवर्षीसारखे त्यांना कोकणात जाणाऱ्या गाड्या पकडण्यासाठी ठाणे, दादर गाठावे लागणार आहे, कारण या गाड्यांना दिवा जंक्शनला थांबाच नाही.

कोकणातील चाकरमान्यांचा सर्वाधिक प्रिय असलेल्या सणांपैकी गणपती उत्सव आता जवळ येवून ठेपला आहे. बऱ्याच चाकरमान्यांनी रेल्वे गाड्यांची आगावू तिकीटे काढून ठेवली आहेत. यातील मोठ्या संख्येने कोकणात जाणारे प्रवासी दिवा परिसरात राहतात. अशा प्रवाशांना ठाणे, दादर या ठिकाणी जावून गाड्या पकडाव्या लागत असून हे त्रासदायक आहे. त्यामुळेच की काय गणेशभक्तांना या उत्सवादरम्यान कोकणात जावे लागते त्यामुळे या गाड्यांना
दिव्यात थांबा द्यावा अशी मागणी दिवा रेल्वे प्रवाशी संघटनेचे अध्यक्ष अँड.आदेश भगत यांनी रेल्वे प्रशासनाकडे केली आहे.

काही दिवसांनी कोकणात मोठ्या प्रमाणावर दिव्यातून चाकरमानी गणेश उत्सावासाठी जाणार आहेत. त्यांना ठाणे, दादर, सीएसएमटी, पनवेल, कल्याण या ठिकाणी आपल्या ओझ्यासह जावून रेल्वे गाडी पकडावी लागत आहे. ठाण्यात सर्वाधिक प्रसिद्ध म्हणून दिवा टर्मिनल्स असताना ते नावापुरतेच आहे. येथे मोजक्याच जलद लोकल थांबतात. त्यामुळे नागरिकांना येता-जाताना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या ठिकाणी दिवा रत्नागिरी मेमू स्पेशल व दिवा-चिपळुण मेमू स्पेशल अशा अनेक ज्यादा गाड्या सोडण्यात आलेल्या आहेत. यापैकी मुंबई- सावंतवाडी गणपती स्पेशल (०११७१/०११७२), मुंबई-मडगाव गणपती स्पेशल (०११५१/०११५२) या स्पेशल गाडयांना दिवा स्थानकात थांबा दिल्यास प्रवाशांची गैरसोय दूर होण्यास मदत होणार आहे.

हे सुद्धा वाचा
हसमुख असलेल्या रामदास आठवले यांनी वाढवली शिंदे गटाची चिंता

हसमुख असलेल्या रामदास आठवले यांनी वाढवली शिंदे गटाची चिंता
पेशवे हे दुष्ट, नीच प्रवृत्तीचे होते; भालचंद्र नेमाडेंचं वक्तव्य, समाज माध्यमात नेमाडे यांच्यावर टीका
दिवा हे गाव होते. 20 वर्षात या गावाचे आता उपनगर झाले आहे. एकेकाळी दिव्यात मोठ्या प्रमाणात आगरी समाज भात पीक घेत असे. शिवाय मासेमारी हा प्रमुख व्यवसाय होता. पण हळूहळू शहरीकरण झाल्याने या परिसरात मोठ्या प्रमाणात बेकायदा बांधकामे निर्माण झाली आहेत. या परिसरात कमी किमतीत घरे मिळत असल्याने मोट्या प्रमाणात मध्यमवर्गी लोक रहायला आले आहेत. त्यात कोंकणी माणसांची संख्या आगरी समाजानंतर जास्त आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी