38 C
Mumbai
Tuesday, April 16, 2024
HomeमुंबईBMC : बीएमसीच्या परीक्षा घोटाळया विरोधात कामगार संघटना आक्रमक, परीक्षाच रद्द करण्याची...

BMC : बीएमसीच्या परीक्षा घोटाळया विरोधात कामगार संघटना आक्रमक, परीक्षाच रद्द करण्याची केली मागणी

मुंबई महानगर पालिकेतील वरिष्ठ लिपीक पदाच्या भरती संदर्भात झालेल्या घोटाळयावर दि म्युनिसिपल युनयिनने आवाज उठवला आहे. मुंबई पालिकेमध्ये काही दिवसांपूर्वी वरिष्ठ लिपीक पदाच्या परीक्षेचा घोटाळा उघड झाला आहे. त्या घोटाळया विरोधात अनेक संघटना आता आक्रमक होतांना दिसत आहेत.

मुंबई महानगर पालिकेतील वरिष्ठ लिपीक पदाच्या भरती संदर्भात झालेल्या घोटाळयावर दि म्युनिसिपल युनयिनने आवाज उठवला आहे. मुंबई पालिकेमध्ये काही दिवसांपूर्वी वरिष्ठ लिपीक पदाच्या परीक्षेचा घोटाळा उघड झाला आहे. त्या घोटाळया विरोधात अनेक संघटना आता आक्रमक होतांना दिसत आहेत. या घोटाळयात अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांचा हात आहे. गेल्या अनेक वर्षांमध्ये या पदांसाठी परीक्षा घेण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. मुंबई महापालिकेतील मुख्य लिपीक आणि वरिष्ठ लेखा परीक्षा व लेखा सहाय्य पदाच्या (BMC exam scam)पदोन्नतीसाठी असलेली परीक्षेची अट रद्द करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची तसेच अर्जदार कर्मचाऱ्यांना उत्तीर्ण घेाषीत करण्याची मागणी दि म्युनिसिपल युनयिनने केली आहे.

कोरोना महामारीमध्ये मुंबई महानगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी रुग्णांच्या सेवेसाठी आपल्या जीवची बाजी लावली. सुमारे 250 हून अधिक कर्मचारी शहीद झाले आहे. अनेक जण कौटुबिक संसर्गामुळे बळी गेले आहेत. त्याची संख्या हजारापेक्षा जास्त आहे. त्यामुळे पालिकेमध्ये कर्मचारी भरती करणे आपेक्षीत आहे. परंतु गेल्या 17 वर्षांच्या काळात केवळ 4 वेळाच परीक्षा घेण्यात आल्या. मात्र खात्यांतर्गत परीक्षा एकदाही घेण्यात आल्या नाहीत.

हे सुद्दा वाचा

Eknath Shinde : महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी प्रशासनाला दिल्या सूचना

Urvashi Raitela : उर्वशी रैतेला आली गणेश दर्शनाला, भक्तांनी दिल्या ऋषभ पंतच्या घोषणा !

Neeraj Chopra : नीरज चोप्राचा ‘भाला’ सुसाट, आतापर्यंत कमावले ‘इतके’ पदक

महानगर पालिकेत लिपीक तसेच लेखा परिक्षक पदांसाठी 3000 हून अधिक कर्मचाऱ्यांनी 16 जून 2021 रोजी परीक्षा उत्तीर्ण करण्याची मागणी केली होती. त्या संदर्भात न‍िवेदन दिले होते. त्यासाठी मोर्चे देखील काढण्यात आले होते. तसेच फेब्रुवारी 2022 मध्ये खात्यांतर्गत परिक्षेचे स्वरुप जाचक असल्याने दिनांक 26 जून 2022 रोजी परीक्षा रद्द करण्याची मागणी केली होती. त्यानंतर मुंबई महानगर पालिकेच्या असंवेदनशीलतेमुळे दिनांक 24 जून 2022 रोजी आझाद मैदान येथे मोर्चे काढले होते.

त्यावेळी पालिकेला पुन्हा एकदा विचार करुन परीक्षा रद्द करण्याची मागणी केली होती. या मोर्चात आमदार कपील पाटील यांचा देखील सहभाग होता. त्यानंतर दिनांक 26 जून 2022 रोजी काही निर्णय घेण्यात आले होते. यामध्ये वरिष्ठ लिपीक व लेखा सहाय्यक पदाच्या पदोन्नतीसाठी होत असलेल्या परीक्षा निर्धार‍ीत वेळेत होतील. तसचे लिपीक व कनिष्ठ परीक्षांमध्ये 50 टक्के पदे ही राखीव असतील.

तसेच या पदावरील उमेदवारांना 10 वर्षे पुर्ण झाल्यानंतर नियम‍ित करण्यात येईल. आदी निर्णय देण्यात आले होते. मात्र निर्णयाची अंमलबजावणी मुंबई महानगरपालिकेने केलेली नाही. या उलट वरिष्ठ अधिकाऱ्यांनी असंख्य परिक्षार्थीना अनुत्तीर्णकरुन त्यानंतर पुन्हा फेरतपासणी करून शेकडो उमेदवारांना उत्तीर्ण केले. अनेक उमेदवारांना वाढवून गुण देण्यात आले आहेत. त्यामुळे मुंबई पालिकेतील अधिकाऱ्यांचा गैर कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी