32 C
Mumbai
Sunday, May 21, 2023
घरमुंबईभारतातील ट्विटरच्या दोन कार्यालयांना लागणार टाळे; मस्क यांचा चिंताजनक निर्णय

भारतातील ट्विटरच्या दोन कार्यालयांना लागणार टाळे; मस्क यांचा चिंताजनक निर्णय

एलन मस्क यांनी ट्विटरची सूत्रे हाती घेतल्यापासून कंपनी खर्च कपातीचे आणि ट्विटरचे आर्थिक आरोग्य सुधारण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. खर्च कपातीच्या दृष्टीने अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने गेल्या वर्षीच्या अखेरीस जागतिक स्तरावर सुमारे 50 टक्के कर्मचारी काढून टाकले आहेत. याधर्तीवर ट्विटरच्या या कर्मचारी कपतीच्या सत्रात कंपनीचा खर्च आणि वेळ वाचविण्यासाठी मस्क यांनी भारताच्या दृष्टीने एक चिंताजनक निर्णय घेतला आहे. (Two Indian Twitter offices will be closed; Alarming decision by Elon Musk)

गेल्या वर्षीच्या उत्तरार्धात भारतातील सुमारे 200 पेक्षा जास्त कर्मचार्‍यांपैकी 90% हून अधिक कर्मचार्‍यांना काढून टाकणार्‍या ट्विटरने राजकीय केंद्र नवी दिल्ली आणि आर्थिक केंद्र मुंबईतील कार्यालये बंद केली आहेत आणि संबंधित कर्मचारी मात्र वर्क फ्रॉम होम करत आहेत. सध्या भारतातील ट्विटरची कंपनी बंगळुरू येथील टेक हबमध्ये बहुतेक अभियंते असलेले कार्यालय चालवत आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली. ट्विटरचे सीईओ एलन मस्क किंवा ट्विटर कंपनीने याबाबत कोणतीही पुष्टी अद्याप केलेली नाही. एलन मस्क यांनी 44 बिलियन डॉलरला ट्विटर टेकओव्हर केल्यानंतर मस्क यांनी महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. परंतु भारताच्या दृष्टीने ही एक चिंताजनक बाब आहे.

ब्लूमबर्गच्या (Bloomberg) वृत्तानुसार, भारतील तीन ट्विटर कार्यालयांपैकी दोन कार्यालये बंद करण्याचा निर्णय ट्विटरने घेतला आहे. त्यामुळे भारतातील नवी दिल्ली आणि मुंबई येथील ट्विटरची कार्यालये बंद होणार असून, केवळ बंगळूर येथील ट्विटर कार्यालय सुरू राहणार असल्याची माहिती समोर आली आहे. याबाबतची माहिती CNBC-TV18 ने अधिकृत ट्विटर हॅंडलवर दिली आहे.

ट्विटर हातात घेतल्यापासून मस्क यांनी कंपनी खर्चात कपात करण्याचे आणि ट्विटरचे आर्थिक आरोग्य सुधारण्याचे काम हाती घेतले. खर्च कपातीच्या दृष्टीने अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने गेल्या वर्षीच्या अखेरीस जागतिक स्तरावर सुमारे 50 टक्के कर्मचारी काढून टाकले आहेत. गेल्या वर्षभरात ट्विटरने भारतातील ९० टक्के म्हणजे 200 पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना काढून टाकले आहे. तर भारतातील ट्विटरची दोन्ही कार्यालये बंद केल्यानंतर, कर्मचाऱ्यांना घरूनच काम करण्यास सांगितले आहे. तर भारतातील ट्विटरचे सर्व काम हे दक्षिणेतून म्हणजेच बंगळुरू मधून सुरू राहणार असल्याचेही कंपनीने सांगितले आहे. कंपनी खर्च कपात करण्यासाठी मस्क यांनी हा निर्णय घेतल्याची यातून स्पष्ट होत आहे.

ट्विटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलन मस्क यांनी 2023 मध्ये ट्विटरला आर्थिकदृष्ट्या स्थिर करण्याच्या दृष्टीने जगभरातील ट्विटर कर्मचारी कपात आणि ट्विटरची कार्यालये बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतातील दिल्ली आणि मुंबई कार्यालये बंद करण्याचा देखील हाच उद्देश असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी