30 C
Mumbai
Thursday, March 28, 2024
Homeमुंबईमहाराष्ट्रात ३०० कोटींची गुंतवणूक होणार; मंत्री उदय सामंत यांचा जर्मनी दौरा यशस्वी

महाराष्ट्रात ३०० कोटींची गुंतवणूक होणार; मंत्री उदय सामंत यांचा जर्मनी दौरा यशस्वी

शिंदे-फडणवीस सरकारवर सध्या राज्यात गुंतवणूकवाढीसाठी प्रयत्न करत आहे. १६ आणि १७ जानेवारी रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दावोस दौऱ्यावर जाणार असून गुंतवणूकवाढीसाठी प्रयत्नशील आहेत. तर राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत (Uday Samant) हे सध्या जर्मनीच्या दौऱ्यावर (Germany Visit) असून दौऱ्याच्या पहिल्याच दिवशी त्यांनी मंत्री सामंत यांनी स्टुटगार्ट येथील ट्रम्प कंपनीला (Trump Company) भेट देत राज्यात ३०० कोटी रुपयांची गुंतवणूक आणण्याबाबत सकारात्मक चर्चा केली. ट्रम्प कंपनी पुढील दोन वर्षांत महाराष्ट्रात सुमारे तीनशे कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. (Uday Samant’s Visit to Germany Successful Trump Company 300 Crores Will Be Invested In Maharashtra)

जर्मनी दौऱ्यात सामंत यांनी स्टुटगार्ट येथील ट्रम्प कंपनीच्या उत्पादन निर्मिती केंद्राला भेट दिली. यावेळी ट्रम्प कंपनीचे सीईओ रिचर्ड बॅनम्युलर आणि ट्रम्प इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक संदीप पाटील यांनी सामंत यांचे स्वागत केले. बॅनम्युलर यांनी कंपनीच्या अत्याधुनिक लेझर कटिंग मशीन्स आणि फोल्डिंग मशीन्सचे सादरिकरण केले. विजेवर चालणाऱ्या वाहनांच्या (EV) बॅटरी आणि बॅटरी स्टोरेज युनिट्स तयार करण्यासाठी या मशिन्स वापरल्या जात आहेत. या मशिन्ससाठी ट्रम्फ कंपनी महाराष्ट्रात निर्मिती प्रकल्प सुरू करण्यास उत्सुक आहे. राज्यात प्रकल्प सुरु करण्यासाठी सामंत यांनी कंपनीला महाराष्ट्र भेटीचे निमंत्रिण दिले आहे. तसेच प्रकल्प सुरू करण्यासाठी शासन पूर्ण सहकार्य करेल असे आश्वासन दिले. कंपनीचे प्रतिनिधी पुढील महिन्यात महाराष्ट्राला भेट देऊन स्थळपाहणी करणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले.

लॅप केबल्स समुहाला भेट
उद्योगमंत्री सामंत यांनी यावेळी स्टुटगार्ट येथील लॅप केबल समूहाला भेट दिली. यावेळी बार्डनचे संचालक आणि भारताचे वाणिज्य दूत अँड्रियास लॅप यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी लॅप यांनी ईव्ही चार्जिंग केबल्समधील नवीन तंत्रज्ञान आणि पोर्टेबल ईव्ही अडॅप्टरचे सादरिकरण केले. समृद्धी महामार्गावर या तंत्रज्ञानाचा वापर करून यंत्रणा उभारण्याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. उच्च दर्जाच्या तांब्याच्या धातुसाठी प्रसिद्ध असलेल्या चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्याला भेट देण्याचे कंपनीला निमंत्रण देण्यात आले. याचदरम्यान, इंडो जर्मन चेंबर ऑफ कॉमर्सच्यावतीने महाराष्ट्रात जर्मन कंपन्यांकडून गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी आणि महाराष्ट्र आणि बार्डन वुर्टेमबर्ग यांच्यातील द्विपक्षीय संबंध वाढवण्यासाठी गोलमेज परिषदेचे आयोजन केले होते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी