31 C
Mumbai
Monday, May 15, 2023
घरमुंबईहे कोणत्या लोकशाहीत बसते?, बीबीसीवरील धाडीवर उद्धव ठाकरे संतापले!

हे कोणत्या लोकशाहीत बसते?, बीबीसीवरील धाडीवर उद्धव ठाकरे संतापले!

बीबीसी (BBC) या अंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेच्या दिल्ली आणि मुंबईतील कार्यालयांवर मंगळवारी आयकर विभागाने (income tax department ) धाड (raid) टाकली. यावेळी बीबीसीच्या कर्मचाऱ्यांचे फोन देखील जप्त करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. बीबीसी कार्यालयावरील धाडीनंतर विरोधी पक्षांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी देखील सत्ताधाऱ्यांवर टीका करत ‘एखाद्या एखाद्या प्रसारमाध्यमाच्या कार्यालयावर धाड टाकणे हे कोणत्या लोकशाहीत बसते? असा सवाल केला आहे. (Uddhav Thackeray angry after income tax department raid on BBC!)

दादर येथील शिवसेना भवन येथे रायगड जिल्ह्यातील विविध पक्षांचे पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत (ठाकरे गट) प्रवेश केला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी पत्रकारपरिषदेत भाजपवर जोरदार टीका केली. उद्धव ठाकरे म्हणाले, ‘आम्ही वाटेल ते करू पण तुम्ही आवाज उचलायचा नाही. जर आवाज उठवाल तर चिरडून टाकू, ही पाशवी वृत्ती आज देशात फोफावायला बघतेय. आपण वेळेवर एकत्र आलो नाहीत तर संपूर्ण देश खाऊन टाकेल.

हे सुद्धा वाचा 

बीबीसी कार्यालयांवर झालेल्या आयकर विभागाच्या छापेमारीमागे मोदींचा हात?

मोदींचे चुकलेच, ‘बीबीसी’ची ‘ती’ डॉक्युमेंटरी ब्लॉक करायला नको होती; पदमभूषण विजेत्या एस. एल. भैरप्पा यांचे मत

बीबीसीच्या मोदींवरील डॉक्युमेंट्री स्क्रीनिंगवरुन जेएनयूमध्ये गोंधळ

ठाकरे पुढे म्हणाले, आत्ताची लढाई स्वातंत्र्य टिकवण्यासाठीची लढाई आहे. कुणी म्हणत असेल की आम्ही हिंदुत्व सोडले तर त्यांचे हिंदुत्व तपासून घेण्याची गरज आहे. मोहन भागवत जेव्हा मशिदीमध्ये जातात तेव्हा त्यांनी हिंदुत्व सोडलं होतं का? असा खडा सवाल करत राष्ट्रीयत्व हेच आमचं हिंदुत्व असल्याचे सांगत माझी भारतमाता पुन्हा गुलाम कशी होईल यादिशेने मोदींची पाऊले जातायेत. ही पाऊले ओळखून आपल्याला एकत्र आले पाहिजे असे ठाकरे यावेळी म्हणाले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी