28 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
HomeमुंबईUddhav Thackeray :उद्धव ठाकरेंचा उद्या ऑनलाईन संवाद, शिवसैनिकांना करणार मार्गदर्शन !

Uddhav Thackeray :उद्धव ठाकरेंचा उद्या ऑनलाईन संवाद, शिवसैनिकांना करणार मार्गदर्शन !

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या 'मार्मिक' या व्यंगचित्र साप्ताहिकाचा उद्या 62 वा वर्धापन दिन आहे. त्या निम‍ित्ताने शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे उद्या संध्याकाळी 6.30 वाजता मातोश्री येथून फेसबुक लाईव्हव्दारे शिवसैनिकांना मार्गदर्शन करणार आहेत.

महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंनी आपला पक्ष वाढविण्यासाठी पुन्हा एकदा कंबर कसली आहे. शिंदे गटाने मोठा झटका दिल्यानंतर देखील उद्धव ठाकरे सकारात्मक भूमीका मांडतांना दिसत आहेत. मुख्यमंत्री पदाची सूत्रे हातामध्ये असतांना त्यांनी अनेक वेळा फेसबुक लाईव्हव्दारे जनतेशी संवाद साधला होता. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या ‘मार्मिक’ या व्यंगचित्र साप्ताहिकाचा उद्या 62 वा वर्धापन दिन आहे. त्या निम‍ित्ताने शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे उद्या संध्याकाळी 6.30 वाजता मातोश्री येथून फेसबुक लाईव्हव्दारे शिवसैनिकांना मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे सध्याच्या राजकीय परिस्थितीवर व्यंगात्मक फटकारे मारणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

हे सुद्धा वाचा

Egg Prices :अंडी दर घसरल्याने कुक्कुटपालन व्यवसायाचे नुकसान

Deepak Kesarkar : दीपक केसरकर बच्चू कडूंची नाराजी दूर करणार

BMC : प्रवेश नाकारणा-या शाळांकडे मुंबई महानगपालिकेचे सपशेल दुर्लक्ष

महाराष्ट्र राज्य स्थापन झाल्यानंतर 1960 साली ‘मार्मिक’ ची स्थापना झाली. त्याच वर्षी आचार्य अत्रेंच्या वाढदिवशी यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते ‘मार्मिक’ सुरु झाला. ‘मार्मिक’ हे नाव प्रबोधनकारांनी ठेवले. बाळासाहेब ठाकरे ‘फ्री प्रेस जर्नल’ या इंग्रजी वर्तमानपत्रात व्यंगचित्रकार म्हणून करत होते. त्यावेळी त्यांना मालकांनी व्यंगचित्र काढू नको असे सांगितले. वारंवार असे सांगितल्यानंतर बाळासाहेबांनी नोकरी सोडली. त्यानंतर त्यांनी व्यंगचित्रांचे साप्ताहिक काढायचे ठरवले. त्याला प्रबोधनकार ठाकरेंनी ‘मार्मिक’ हे नाव ठेवले. ‘मार्मिक’ नंतर शिवसेनेची स्थापना झाली.

‘मार्मिक’ने मराठी माणसांच्या मनात आत्मविश्वास निर्माण केला. मार्मिकने मराठी माणसांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडली. एका व्यंगचित्रकाराने केवळ कुंचल्याच्या करामतीने इतिहास घडवला. बाळासाहेबांना श्रीकांत ठाकरे तसेच विकास सबनीस यांनी साथ दिली. बाळासाहेबांनी काढलेल्या ‘मार्मिकच्या व्यंगचित्रांमध्ये राजकीय भाष्य असे, त्यामध्ये व्यापक अर्थ दडलेला असे. जे अग्रलेखातून सांगू शकत नाही, ते व्यंगचित्रातून सांगता येतं. आपल्याला जे दिसत नाही मात्र त्यात दडलेला मतितार्थ दाखवायचे काम व्यंगचित्र करतात. बाळासाहेबांनी काढलेल्या ‘मार्मिकच्या व्यंगचित्रामध्ये कल्पना, विनोद, चेहरा, हावभाव, भाषा ओतप्रोत भरलेली असे.

चित्रांची रचना, चेहऱ्यावरील हावभाव नेमका अर्थ सांगून जात. बाळासाहेब ठाकरेंनी 1947 मध्ये देखील इंग्रजी वर्तमानपत्रांसाठी व्यंगचित्र काढली. त्या काळात घरोघरी टीव्ही देखील नव्हता. ब्रशने मारलेल्या मोजक्याच नाजूक आणि रेखीव रेषांनी ही चित्र पर‍िपूर्ण होती. त्यांच्या चित्रातील रेषा व्यक्तींंचे वय देखील दाखवत. त्यामुळे केवळ रेषांवर आधारीत असलेली ही चित्र जिवंत होती. तितकीच बोलकी होती. बाळासाहेब ठाकरेंनी आपल्या कारकीर्दीमध्ये हजारो व्यंगचित्र काढली.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी