28 C
Mumbai
Thursday, August 4, 2022
घरमुंबई’उध्दव ठाकरेंनी शरद पवारांची साथ सोडावी’ - रामदास कदम

’उध्दव ठाकरेंनी शरद पवारांची साथ सोडावी’ – रामदास कदम

टीम लय भारी

मुंबईः शिवसेनेचे निष्ठावान नेते रामदास कदमांनी काल शिंदे गटात प्रवेश केला. पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी  प्रवेश करण्याची कारणं असलेले पत्र देखील दिले. शिवसेना सोडतांना त्यांनी खुप दुःख होते, असल्याचे त्यांनी सांगितले. आज माध्यमांना प्रतिक्रीया देतांना त्यांनी आपल्या भावनांना वाट करुन दिली. रामदास कदम यांना शिसेनेतून बाहेर पडल्यानंतर आश्रु अनावर झाले.आज माध्यमांसमोर बोलतांना त्यांनी शिवसेना सोडण्याची अनेक करणं सांगितली.

शिवसेना फोडण्याचा शरद पवारांचा घाट होता. शरद पवारांनी उध्दव ठाकरेंना फसवले. खासदार, आमदार, नगरसेवक सगळे शिंदे गटात जाताहेत. पक्ष संपला तरी चालेल. पण शरद पवारांची साथ सोडायची नाही. बाळासाहेबांच्या आत्म्याला दुःख झाले. तरी चालेल. पण उध्दवजींनी दोन पावलं मागे यायला हवे. उध्दवजींच्या आसपास जे लोक आहेत. ते त्यांना जाऊ देणार नाही.

‘जो तेल लावलेला पेहलवान’ आहे तो कमाल आहे. उध्दव ठाकरे आजारी होते. त्यांना कोरोना होता. त्याचा फायदा त्यांनी आणि अजूबाजूच्या लोकांनी घेतला. यावेळी ते म्हणाले की, मला तुटेल असे बोलायचे नाही. वेदना होत आहेत. तर बंडखोर पुन्हा पक्षात आले असते,असे ते यावेळी म्हणाले.

गुलाबराव पाटील यांनी सुरुवातीला उध्दव ठाकरेंना समजवले. त्यावेळी उध्दव ठाकरेंनी तुम्हाला जायचे तर तुम्ही जा असे सांगितले. शिवसेनेला वाढवण्यात आमचे योगदान आहे. बरेचसे पाणी पूला खालून गेले आहे. दोन्ही बाजूने कायदेशीर लढाई सुरु आहे. काही गोष्टी मी आता बोलणार नाही. यावेळी त्यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या आठवणी सांगितल्या. काॅंग्रेस सोबत जाण्याची वेळ आली. तर मी माझं पक्षाचं दुकान मी बंद केले असते. आमची शिवसेना अभेदय असावी. आम्हाला हे सगळं बघवत नाही. असेही ते यावेळी म्हणाले.

आदित्य ठाकरे आमदार गोवाहाटीला गेले होते. त्यांना काय बोलले. त्यांचे हे बोलण्याचे वय नाही. मी ज्या वेळेला महाविकास आघाडीचे सरकार बनत होते, त्यावेळी सांगितले की, काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस सोबत घरोबा करु नका. हे सांगून बाहेर पडल्यानंतर मी पावणे तीन वर्षे ’मातोश्री’ वर गेलो नाही. मला बोलावून सांगितले. मीडिया समोर बोलू नका. तोंड दाबून बुक्कयांचा मार मी खात हातो.

उध्दव ठाकरेंवर मी टीका करु देणार नाही. शरद पवार आजित पवारांना जे हवे होते. ते होऊ देणार नाही. मी रात्रभर झोपलो नाही. ही वेळ येईल असे वाटले नव्हते. आम्ही काय वाईट केले. आम्ही काय चुक केली. आमची हाकालपट्टी करताय तुम्ही. 52 वर्षे शिवसेनेत काम करुन तुम्ही हाकालपट्टी झाली असे म्हणता याचे रामदास कदमना  दुःख झाले आणि रामदास कदमांना रडू आवरले नाही.

यावेळी त्यांनी विनायक राऊतांवर निशाणा साधला. बेईमानी आमच्या रक्तात नाही. एकनाथ शिंदेनी पक्ष वाचवलाय. उध्दवजी कुठूतरी बसून निर्णय घ्या. असे आव्हान रामदास कदम यांनी उध्दव ठाकरेंना केले. माझा मुलगा योगेश सहा महिने वेळ मागत होता.पण तुम्ही वेळ दिला नाही. आता तुमच्याकडे वेळ आहे. आम्ही सगळी भावंड, पत्नी आम्ही सगळयांनी विचार केला. आमदार जी भूमीका घेत आहेत. ती योग्य आहे त्यानंतर आम्ही शिंदे गटात गेलो. पक्ष मनामध्ये आहेत.

यावेळी शिवसेनेसाठी आम्ही जिवाचे रान केले. ते त्यांनी आवेशाने सांगितले. आमच्या बद्दल आणखी कोणी काही बोलले तर भूकंप होईल. शिवसेनेमध्ये शेकडो लोकांचे बळी गेले, अनेक शिवसैनिक जेलमध्ये गेले, अनेक शिवसैनिकांचे रक्त सांडले. 1977 सालामध्ये झालेल्या आंदोलनात आम्हाला अटक झाली होती. काही दिवसांपूर्वीच बेळगावला जावून 10 लाखांचा जामीन घेतला. आशा प्रकारे तिव्र शब्दात रामदास कदम यांनी भावनांना वाट मोकळी करुन दिली.

हे सुध्दा वाचा:

पुन्हा घात! नाशकात शिवसेना पदाधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला

शिवसेनेच्या तालुका प्रमुखाने उद्धव ठाकरे यांना रक्ताने लिहिले पत्र

बॉम्बचा वापर करुन एटीएममध्ये चोरीचा डाव पोलिसांनी उधळला

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!