30 C
Mumbai
Sunday, September 29, 2024
HomeमुंबईUrvashi Raitela : उर्वशी रैतेला आली गणेश दर्शनाला, भक्तांनी दिल्या ऋषभ पंतच्या...

Urvashi Raitela : उर्वशी रैतेला आली गणेश दर्शनाला, भक्तांनी दिल्या ऋषभ पंतच्या घोषणा !

उर्वशी रौतेला मुंबईमध्ये गणेश दर्शनासाठी आली होती. त्यावेळी लोक तिला पाहून ऋषभ पंतच्या नावाने ओरडू लागले. त्यामुळे उर्वशी रौतेला नाराज झाली.

उर्वशी रौतेला मुंबईमध्ये गणेश दर्शनासाठी आली होती. त्यावेळी लोक तिला पाहून ऋषभ पंतच्या नावाने ओरडू लागले. त्यामुळे उर्वशी रौतेला नाराज झाली. कारण त्यावेळी मोठया संख्यने नागर‍िक उपस्थ‍ित होते. तिने चाहत्यांना स्माईल देखील दिली. परंतु ते ऋषभ पंतच्या नावाने ओरडू लागले, त्यामुळे ती एकदम शांत दिसत होती. मात्र तिची नाराजी तिच्या चेहऱ्यावरुन लपत नव्हती. त्या नंतर तिने सोशल मीडियावर आपली नाराजी व्यक्त केली. काही द‍िवसांपूर्वी उर्वशी आणि ऋषभ पंत बरोबर नाव जोडले गेले होते. त्यावेळी सोशल मीडियावर उलटसुलट चर्चांना उधाण आले होते. त्यामुळे चाहत्यांनी ती दिसताच तिला चिडवायला सुरूवात केली.

या घटनेचा एक व्हिडीओ उर्वशी रौतेला हिने सोशल मीडियावर व्हायरल केला. त्यावेळी त‍िने एक कॅप्शन दिले आहे. ती लिहिते की, ‘ हे सर्व बंद करा, नाहीतर…’ अशा प्रकारे तिने तिला चिडवणाऱ्यांना सज्जड दम भरला. तिला ऋषभ पंतच्या नावाने ट्रोल करण्यात आले. उर्वशी रौतेला ही मागच्या काही दिवसांपूर्वी भारत पाकिस्तानमध्ये होणारा एशिया कप क्रिकेट मॅच पाहण्यासाठी पोहचली होती. त्यामुळे ती जास्त चर्चेमध्ये आली.

एक वेळेस त‍िने सांगितले की, मला मॅच पाहणे पसंत नाही. मात्र ती अचानक मैदानात आल्यामुळे लोकांच्या नजरा तिच्यावर खिळल्या होत्या. त्यामुळेच लोकांनी ऋषभ पंत बरोबर तिचा संबंध पुन्हा जोडला. तिला चिडवू लागले. त्यामुळे ती आता चिडवणाऱ्या तिच्या चाहत्यांवर संतप्त झाली आहे.

हे सुद्या वाचा :

Neeraj Chopra : नीरज चोप्राचा ‘भाला’ सुसाट, आतापर्यंत कमावले ‘इतके’ पदक

Queen Elizabeth : राणी एलिझाबेथ यांच्या निधनामुळे राष्ट्रगीत बदलणार, चलन बदलणार, अन् सैन्यदलातील बोधचिन्ह बदलणार

Queen Elizabeth II : महाराणी एलिझाबेथ यांच्या पार्थ‍िवावर 10 दिवसांनी होणार अंत्यसंस्कार

कोण आहे उर्वशी रौतेला ?
उर्वशी रौतेला हिचा जन्म 25 फेब्रुवारी 1994 मध्ये झाला. ती एक सिने अभ‍िनेत्री तसेच मॉडेल आहे. तिने आपल्या कर‍िअरची सुरूवात अनिल शर्माच्या ऍक्शन-रोमांच या चित्रपटापासून केली. 2012 मध्ये मिस इंडिया या पदाची ती मानकरी ठरली. तिने दिल्ली येथील गर्गी कॉलेजमध्ये शिक्षण पूर्ण केले. ‘सिंह साब द ग्रेट’ या चित्रपटाचे तिने डेब्यु केले. मि. ऐरात या कन्नड चित्रपटातही तिने डेब्यु केले. त्यानंतर तिने ‘भाग जॉनी’ हा चित्रपट केला. ‘सनम रे’, ‘ग्रेट ग्रॅण्ड मस्ती रागिनी’, ‘काबिल’, ‘पोरोबाशिनी’, ‘हेट स्टोरी’, ‘पागलपंती’, ‘वर्जिन भानुप्रिया’ आदी चित्रपटात तिने काम केले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी