28 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
HomeमुंबईValentine's Day 2023: गुगल डूडलने बरसवल्या प्रेमाच्या सरी...

Valentine’s Day 2023: गुगल डूडलने बरसवल्या प्रेमाच्या सरी…

आज आहे व्हॅलेंटाईन डे म्हणजेच प्रेमाचा दिवस. दरवर्षी लोक आपल्या प्रियजनांसोबत हा दिवस साजरा करतात. गुगलसुद्धा ह्या वर्षातील सर्वात रोमँटिक दिवस साजरा करण्यासाठी सज्ज आहे. गुगल डूडलने पावसाचे दोन थेंब पाडून हृदय बनवले आहे, हे दोन जिवांचे एक होण्याचे संकेत देते. आज गुगल डुडलमध्ये अशा आशयाचे रोमॅंटिक कार्टून अनिमेशन दाखविले गेले आहे. (Valentine’s Day special: Google Doodle)

Valentine's Day 2023
सौजन्य : गुगल

आज 14 फेब्रुवारी रोजी व्हॅलेंटाईन डेच्या स्मरणार्थ गुगलने हे डूडल शेअर केले आहे. गुगल सर्च बारमध्ये ॲनिमेटेड व्हॅलेंटाईन डे डूडल दाखवत आहे. त्याचप्रमाणे गूगलने जगभरातील प्रियकरांसाठी एक खास संदेश देखील पाठविला आहे.

पाऊस अथवा प्रकाश, तू माझी होशील का? (Rain or shine, will you be mine? )

आजचा व्हॅलेंटाईन डे डूडल वर्षातील सर्वात रोमँटिक दिवस म्हणून साजरा करत आहे. आज जगभरातील लोक भेटवस्तू, शुभेच्छा आणि बऱ्याच गोष्टींची (भावना, संवेदना) देवाणघेवाण करतात आणि  प्रियकर, मित्र आणि भागीदार यांच्याबद्दल प्रेम व्यक्त करतात. तुम्हाला माहीतेय का की, मध्ययुगात, इंग्लंड आणि फ्रान्स सारख्या युरोपीय देशवासीयांचा असा विश्वास होता की, 14 फेब्रुवारी हा पक्ष्यांच्या वीण हंगामाची सुरुवातीचा काळ आहे आणि यानंतर लगेच प्रेमाच्या दिवसाला सुरुवात होते. दरम्यान, 17 व्या शतकापासून हा दिवस जगभरात अधिक लोकप्रिय झाला.

गूगलने पुढे म्हटले आहे की, तुमचा आजचा अंदाज काहीही असो. पण आम्हाला आशा आहे की, तुम्ही एखाद्या खास व्यक्तीसोबत आनंद साजरा कराल. अशा आशयाचे मजकूर टाकत गूगलने व्हॅलेंटाईन डेच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

हे सुद्धा वाचा :Republic day 2023 : प्रजासत्ताक दिनानिमित्त गुगलचे खास डूडल; पाहा गुजरातच्या देशप्रेमीची कलाकृती

भारताच्या कवयित्री सुभद्रा चौहान यांना गुगलने डूडल बनवत दिली श्रद्धांजली

Google च्या जगभरातील १२,००० कर्मचाऱ्यांवर कुऱ्हाड

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी